एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन असलेले मेसेजिंग अॅप्स लोकप्रिय होत असले तरी याच अॅप्समुळे आता दहशतवाद्यांवर नजर ठेवणे काहीसे कठीण झाले आहे. दहशतवादी कारवायांसाठी दहशतवाद्यांकडून एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन असलेल्या मेसेजिंग अॅप्सचा वापर वाढल्याची माहिती समोर आली आहे. यात व्हॉट्स अॅपसह आयसीक्यू, विकर’, ‘जॅबर’ या अॅप्सचा समावेश आहे.

जम्मू- काश्मीरमध्ये ब्रेन वॉश झालेल्या तरुणांची तपास यंत्रणांकडून धरपकड सुरु होती. या कारवाई दरम्यान दहशतवाद्यांकडून तंत्रज्ञानाचा वापर वाढल्याचे समोर आले.  गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध असणाऱ्या अन्य अनेक अॅप्सचा वापर करून जिहादी इतर दहशतवाद्यांशी संवाद साधत आहे. हे मेसेजिंग अॅप ‘end-to-end encryption’ या प्रणालीवर आधारित असल्यानं त्यांच्यातील संवादाचं तपशील मिळवणं हे अवघड असल्याचं समोर आलं आहे. त्यांच्या जवळच्या मोबाईलमध्ये हे अॅप असल्याचं समोर आलं. पण हे सारे अॅप्लिकेशन एंड टु एंड एन्क्रिप्शनवर प्रणालीवर असल्यानं त्यातील चॅट्स किंवा इतर माहिती मिळवणं अवघड होत असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

जिहादी दहशतवादी कारवायांमध्ये व्हॉट्स अॅप किंवा इतर अॅप्स वापरत असल्याचं निरीक्षण एनआयएनं नोंदवलं होतं. व्हॉट्स अॅप किंवा गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध असणाऱ्या अन्य अनेक अॅप्सचा वापर करून जिहादी इतर दहशतवाद्यांशी संवाद साधत आहे. हे मेसेजिंग अॅप ‘end-to-end encryption’ या प्रणालीवर आधारित असल्यानं त्यांच्यातील संवादाचं तपशील मिळवणं हे अवघड  आहे. जिहाद्यांकडून गुगलवर प्ले स्टोअरवर उपलब्ध असलेल्या ‘आयसीक्यू’, ‘विकर’, ‘जॅबर’ यासारख्या प्रसिद्ध मेसेंजरचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. याचा वापर तरुणांमध्ये जिहादचा प्रसार करणारी तसेच द्वेष निर्माण करणारी भाषणं पाठवण्यासाठी केला जातो. तसेच इतर दहशतवादी कारवायांसंदर्भात संवाद साधण्यासाठी हे अॅप्स वापरले जात असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणेच्या सायबर टीमनं ‘मेल टुडे’ला दिली आहे.

या प्रणालीमुळे आपले मेसेज इतर वाचू शकत नाही हे समजल्यावर जिहादी या अॅप्लिकेशनचा वापर घातपातांच्या कारवाईसाठी किंवा इतरांशी संपर्क साधण्यासाठी करू लागले. आयसिसच्या काही दहशवाद्यांनीदेखील संपर्क साधण्यासाठी विबरचा वापर केला असल्याचंही नुकतच तपासातून समोर आलं. ‘end-to-end encryption’ प्रणाली अनेक मेसेजिंग अॅपमध्ये आहे. यामुळे दोघांतले संवाद हे सुरक्षित असतात. त्यामुळे तिसरा व्यक्ती हे संवाद वाचण्याचा किंवा हॅक करण्याचा प्रयत्न करू शकत नाही पण यामुळे जिहादी त्याचा गैरवापर करत आहेत.