भारतीय जनता पार्टीचे नेते आणि कर्नाटकचे माजी मंत्री केएस ईश्वराप्पा यांनी अजानबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. “अल्लाह बहिरा आहे का?” असा सवाल ईश्वराप्पा यांनी विचारला आहे. ईश्वराप्पा यांनी अजानबाबत केलेल्या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. अलीकडेच कर्नाटकमध्ये हिजाब परिधान करण्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. हे प्रकरण न्यायालयात गेलं आहे. हिजाबचा वाद ताजा असताना आता केएस ईश्वराप्पा यांनी केलेल्या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?

भाजपा नेते केएस ईश्वराप्पा यांनी नुकतंच एका सार्वजनिक कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी ते उपस्थित लोकांना संबोधित करत असताना जवळच असलेल्या एका मशिदीतून लाउड स्पीकरद्वारे अजान देण्यात आली. अजानचा आवाज ऐकल्यानंतर ईश्वराप्पा यांनी आक्षेपार्ह विधान केलं.

हेही वाचा-“अनेक वर्षांपासून शेतकरी आत्महत्या करत आहेत” अब्दुल सत्तारांच्या विधानावर भास्कर जाधव संतापले; म्हणाले…

यावेळी केएस ईश्वराप्पा म्हणाले, “अजान ही माझ्यासाठी डोकेदुखी आहे. मी जिथे जातो तिथे मला याचा त्रास होतो. लाउड स्पीकरवर ओरडल्यावरच अल्लाह त्यांची प्रार्थना ऐकतो का? अल्लाह बहिरा आहे का? सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर लवकरच लाउड स्पीकरवरून अजान देणं थांबेल, यात काही शंका नाही. पंतप्रधान मोदींनी आम्हाला सर्व धर्मांचा आदर करायला सांगितलं आहे. पण मला एक गोष्ट विचारायची आहे की, तुम्ही लाउड स्पीकरवर अजान म्हटली तरच अल्लाह ऐकतो का? हा प्रश्न लवकरात लवकर सोडवायला हवा.”

हेही वाचा- “जसे इकडे बोकड खातात, तसे आसाममध्ये कुत्रे खातात, त्यामुळे…”, अटकेची मागणी होताच बच्चू कडू म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“आपण हिंदूही मंदिरात जाऊन प्रार्थना करतो, श्लोक म्हणतो किंवा भजन गातो. त्यांच्यापेक्षा जास्त आपली श्रद्धा आहे. धर्मांचं रक्षण करणारी भारत माता आहे. लाउड स्पीकरद्वारे अजान म्हटली तरच अल्लाह अजान ऐकतो, असं तुम्ही म्हणाल तर तुमचा अल्लाह बहिरा आहे का? असा प्रश्न मला पडतो. लाउड स्पीकरची गरज नाही, हा प्रश्न लवकर सोडवला पाहिजे,” असंही ईश्वराप्पा म्हणाले.