पाकिस्तानातील लष्कर ए तोयबा व अफगाणिस्तानाचील हक्कानी नेटवर्क या दहशतवादी संघटनांवर कठोर कारवाई करावी, असे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री जॉन केरी यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना सुनावले.
केरी यांनी दहशतवादी गटांना संपवण्याच्या शरीफ यांच्या निर्धाराची प्रशंसा केली व त्यांना असे सांगितले की, हक्कानी नेटवर्क व लष्कर ए तोयबा यांच्यावरही कठोर कारवाई करा.
संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या पाश्र्वभूमीवर केरी यांनी शरीफ यांच्या अफगाणिस्तानशी समेटाच्या भूमिकेची प्रशंसा केली व त्यामुळे स्थिरता व आर्थिक एकात्मताही निर्माण होईल, त्याचा फायदा भारतालाही होईल असे मत व्यक्त केले.
पाकिस्तानात स्थिरता नांदावी व लोकशाही अधिक दृढ होऊन भरभराट व्हावी, असे केरी यांनी सांगितले. लष्कर ए तोयबावर २००८ च्या मुंबई हल्ल्यानंतर बंदी घातली होती. हक्कानी नेटवर्कची स्थापना जलालुद्दीन हक्कानी याने केली होती व २००८ मध्ये काबूलमधील भारतीय दूतावासावरील हल्ल्यात ५८ ठार झाले होत.