खलिस्तान समर्थक आणि ‘वारिस पंजाब दे’ संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंगने अखेर आत्मसमर्पण केले आहे. गेल्या १८ मार्चपासून तो फरार होता. अमृतपालने रविवारी सकाळी मोगा पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं आहे. अमृतपालला पकडण्यासाठी पंजाब पोलिसांकडून देशभरात विशेष मोहिम राबवण्यात आली होती.

हेही वाचा – “सोनिया आणि राहुल गांधी पंतप्रधान झाले का? त्यांना का घाबरता?” घराणेशाहीच्या आरोपांवर खरगेंचा भाजपाला थेट प्रश्न

‘द इंडियन एक्सप्रेस’ने दिलेल्या वृत्तानुसार, अमृतपाल सिंगने शनिवारी स्वत: पंजाब पोलिसांना फोन करून आत्मसमर्पण करणार असल्याची माहिती दिली होती. त्यानुसार मोगा पोलिसांनी त्याला आज सकाळी ७ वाजता रोडे गावातील गुरुद्वाराजवळून ताब्यात घेतले आहे. आत्मसमर्पण करण्यापूर्वी त्याने गुरुद्वारामध्ये जाऊन प्रार्थना केल्याचंही सांगण्यात येत आहे.

दोन दिवसांपूर्वीच अमृतपाल सिंगची पत्नी किरणदीप कौरलाही पंजाब पोलिसांनी अमृतसर विमानतळावरून ताब्यात घेतलं होते. किरणदीप लंडनला पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी ही कारवाई केली होती. याशिवाय पंबाज पोलिसांनी अमृतपाल सिंगच्या अनेक सहकाऱ्यांसह समर्थकांना अटक केली आहे. तसेच पोलिसांकडून अमृतपालचे कुटुंबीय आणि नातेवाईकांचीही चौकशी करण्यात आली होती.

हेही वाचा – राहुल गांधींनी विचारलं “आई आता कुठे जायचं?”, सोनिया गांधी म्हणाल्या…, सरकारी बंगला सोडल्यानंतर काँग्रेसने शेअर केला भावूक VIDEO

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अमृतपाल सिंग आता आसामच्या डिब्रुगडमधील तरुंगात पाठवण्यात येणार आहे. या तरुंगात अमृतपाल सिंगच्या अनेक सहकाऱ्यांसह समर्थकांनाही ठेवण्यात आले आहे.