Asim Munir will be Pakistan next Army chief: लेफ्टनंट जनरल असिम मुनीर यांची पाकिस्तानचे नवे लष्कर प्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे. मुनीर यांनी यापूर्वी पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेनसाठी म्हणजेच इंटर सर्व्हिस इंटेलिन्स अर्थात आयएसआयसाठी काम केलेलं आहे. लेफ्टनंट जनरल साहीर शमशेद मीर्जा यांची नियुक्ती जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफ कमिटीच्या (सीजेसीएसी) अध्यक्ष पदावर करण्यात आली आहे.

पाकिस्तानचे विद्यमान लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांचा कार्यकाळ २९ नोव्हेंबर रोजी संपुष्टात येत आहे. बाजवा यांना तीन वर्षांचा अतिरिक्त कार्यकाळ वाढवून देण्यात आला होता. २०१६ साली त्यांची तीन वर्षांसाठी पाकिस्तानच्या लष्करप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली होती. नंतर त्यांना तीन वर्षांची मुदतवाढ देण्यात आली होती. त्यांना पुन्हा एकदा मुदतवाढ देण्याचा सरकारचा विचार होता मात्र त्यांनी यासाठी नकार दिला.

Sarabjit singh pakistan prisoner
बावीस वर्षे पाकिस्तान तुरुंगात हालअपेष्टा सोसलेल्या सरबजित सिंग यांच्या मारेकर्‍याची हत्या; नेमके हे प्रकरण काय होते?
IRGC behind Israel attack
इस्रायलच्या हल्ल्यामागे कुणाचा हात? ज्यू राष्ट्रावर हल्ला करणारी इस्लामिक संघटना कोणती?
CM Mamata Banerjee On Attack NIA team
‘एनआयए’च्या पथकावर जमावाचा हल्ला, ममता बॅनर्जी यांनी तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनाच सुनावले, म्हणाल्या, “मध्यरात्री लोकांच्या घरात…”
palestine
इस्रायलचे दोन लष्करी अधिकारी बडतर्फ

बाजवांची कारकीर्द कशी?
माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर झालेला हल्ला आणि त्यांनी काढलेल्या रॅलीमुळे सध्या पाकिस्तानमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झालेली आहे. असे असताना या देशाचे नवे लष्करप्रमुख कोण असतील याकडे समस्त जगाचे लक्ष लागले. या प्रश्नाचं उत्तर अखेर मुनीर यांच्या माध्यमातून मिळालं आहे. सध्याचे लष्करप्रमुख बाजवा यांनी आपल्या काळात चीन आणि अमेरिकेशी पाकिस्तानचे संबंध सुधारण्याकडे भर दिल्याचं दिसून आलं. बाजवा यांनी पाकिस्तानच्या आर्थिक धोरणांमध्येही काही प्रमाणात रस दाखवल्याचं दिसून आलं. पाकिस्तानसाठी आर्थिक मदत उभारण्यासाठी त्यांनी चीनसह मध्य पूर्वेतील देशांनी भेट दिली होती. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या माध्यमातून पाकिस्तानसाठी भांडवल उभे करण्यासाठी त्यांनी अमेरिकेशी चर्चादेखील केली आहे. तसेच लष्करप्रमुखपदी असताना बाजवा यांनी पाकिस्तानमधील उद्योगपतींची आपल्या कार्यालयात बैठक बोलावली होती. या बैठकीत त्यांनी उद्योगपतींना अधिक कर भरण्यास प्रोत्साहित केले होते.

भारत-पाकिस्तान संबंध बिघडले…
बाजवा यांच्या कार्यकाळातच २०१९ साली भारत-पाकिस्तान यांच्यातील संबंध आणखी बिघडले होते. याच वर्षात भारताने पाकिस्तानवर हवाई हल्ला केला होता. मात्र बाजवा यांनी त्यावेळी वाद टाळण्यास प्राधान्य दिले होते. भारताचे क्षेपणास्त्र पाकिस्तानी हद्दीत कोसळल्यानंतरही त्यांनी संयमी भूमिका घेतली होती. बाजवा यांच्यावरही राजकीय हस्तक्षेपाचा आरोप करण्यात आलेला आहे. माजी पंतप्रधान इम्रान खान यांना पंतप्रधान म्हणून निवडून येण्यास बाजवा यांनी मदत केली, असा आरोप राजकीय नेते करतात. तर माझ्या राजकीय अध:पतनासाठी बाजवा यांनी पभूमिका बजावली, असा आरोप इम्रान खान यांनी याच वर्षी केला होता.