बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अनुपम खेर पत्नी किरण खेरसाठी प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. किरण खेर यांच्या प्रचारार्थ रॅली आणि सभाचे आयोजन केले आहे. हरयाणातील चंदीगढ या मतदारसंघातून किरण खेर लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. पत्नीसाठी मतं मागायला अनुपम खेर रॅली दरम्यान दुकानांना भेट देत होते. त्यावेळी एका दुकानदाराने अनुपम खेर यांना 2014 चा जाहीरनामाच दाखवला. तसेच, गत निवडणुकांवेळी दिलेल्या वचनांचं काय? असा प्रश्नही या दुकानदाराने विचारला. दुकानदाराच्या या प्रश्नावर अनुपम खेर यांनी एकही शब्द न बोलता काढता पाय घेतला. अनुपम खेर अवघ्या 19 सेकंदामध्ये निशब्द होऊन बाहेर पडले. स्थानिक पत्रकार प्रशांत कुमार यांनी या घटनेचा व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केला आहे. नेटीझन्सनी यावर आपल्या विविध प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. काही नेटीझन्सनी बरोबर असल्याची प्रतिक्रिया दिली आहे तर काहींच्या मते ही विरोधकांनी पद्धशीरपणे योदना आखत अनुपम खेर यांना टार्गेट केले आहे.

स्थानिक प्रसार माध्यमांच्या वृत्तानुसार, प्रचार रॅली दरम्यान अनुपम खेर यांनी एका दुकानात भेट दिली. दुकादाराने अनुपम खेर यांना प्रश्न विचारून गोंधळात टाकले. या दुकानदाराने त्यांना चक्क 2014 च्या निवडणुकांवेळीचा भाजपाचा जाहीरनामाच समोर केला. तसेच, गेल्या जाहीरनाम्यातील प्रश्न अद्याप सुटले नसल्याचे सांगितले. त्यावर, अनुपम खेर यांनी काहीही न बोलता 19 सेंकदामध्ये काढता पाय घेतला. चंडीगड येथे सातव्या टप्प्यात 19 मे रोजी चंडीगड येथे मतदान होणार आहे. या मतदारसंघात सध्या किरण खेर भाजपाच्या विद्यमान खासदार आहेत.