देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप आणि मित्रपक्षांनी धडाकेबाज कामगिरी केली आहे. महाराष्ट्रासह बहुतांश राज्यात भाजप उमेदवारांनी आघाडी घेत विजयाच्या दिशेने कूच केलं आहे. गेल्या काही वर्षांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात विविध मुद्द्यांवरुन टीका करणारे अभिनेते प्रकाश राज यांना जनतेने सपशेल नाकारलं आहे.

बंगळुरु मध्य लोकसभा मतदार संघातून प्रकाश राज यांनी अपक्ष अर्ज भरला होता. गेल्या काही वर्षांमध्ये प्रकाश राज यांनी देशातील बुद्धीवादी विचारवंतांची झालेली हत्या, गो-रक्षकांनी केलेल्या हिंसाचारावरुन मोदींना आपल्या टीकेचं लक्ष्य केलं होतं. मात्र प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये प्रकाश राज यांना जनाधार मिळालाच नाही. केवळ २ टक्के लोकांनी प्रकाश राज यांना मत दिलं आहे.

लोकांनी दिलेल्या कलानंतर प्रकाश राज यांनीही ट्विट करत आपला पराभव मान्य केला आहे.

बंगळुरु मध्य मतदार संघात सध्या भाजपचे पी.सी.मोहन आणि काँग्रेसचे रिझवान अर्शद यांच्याट अटीतटीची लढाई सुरु आहे.