लुईस बर्जर लाचप्रकरणी गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, माजी मंत्री चर्चिल आलेमाव आणि जेआयसीएचे माजी प्रकल्प संचालक आनंद वाचासुंदर यांची नार्को चाचणी करण्यात येणार आहे. गोवा पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण विभागाने न्यायालयाकडे तशी परवानगी मागण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
वाचासुंदर यांची जबानी यापूर्वीच नोंदविण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्यासह आलेमाव यांची नार्को चाचणी करण्याची परवानगी मागण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. लाचप्रकरणी अलीकडेच सादर करण्यात आलेल्या प्राथमिक आरोपपत्रात या दोघांची नावे आरोपी म्हणून समाविष्ट करण्यात आली आहेत, तर दिगंबर कामत यांचे नाव संशयित म्हणून नमूद करण्यात आले आहे.नार्को चाचणी करण्याची परवानगी मिळाल्यास या तिघांना गुजरातमधील गांधीनगर येथे नेण्यात येणार आहे.