Bomb Threat To RSS Office उत्तर प्रदेशमधील लखनऊ आणि उन्नावमधील नवाबगंज येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) चे कार्यालय बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी लखनऊमध्ये एफआयआर दाखल करण्यात आली आहे. तक्रारीनंतर पोलीस धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहे. या धमकीनंतर सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा- पीएनबी घोटाळा; ईडीकडून नवे आरोपपत्र दाखल, मेहुल चोक्सीसह पत्नी प्रीतीवरही आरोप

n m joshi marg bdd chawl redevelopment
ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळ पुनर्विकास; दोन वर्षांत १२६० घरांचा ताबा देण्याचे म्हाडाचे आश्वासन
challenge to the forest officials to find the tigress dropped radio collar
नागपूर : ‘रेडिओ कॉलर’ निघाली; ‘त्या’ वाघिणीचा शोध घेण्याचे वनाधिकाऱ्यांपुढे आव्हान
The district administration announced the list of campaign materials along with food items in the list fixed to account for Lok Sabha election expenses pune
जिल्हाधिकाऱ्यांनी पुण्यात आणली ‘स्वस्ताई’; जाणून घ्या कशी?
aicte directed question papers of technical education courses in two language
पुणे: तंत्रशिक्षणाची प्रश्नपत्रिका आता भाषासुलभ! काय आहे ‘एसआयसीटीई’चा निर्णय?

गुन्हा दाखल

अलीगंज येथे राहणाऱ्या डॉ. नीळकंठ मणी पुजारींना एका विदेशी नंबरवरून ‘व्हॉट्सअ‍ॅप’वर हा धमकीचा मेसेज आला आहे. त्यात लखनऊसमवेत इतर सहा आरएसएसच्या कार्यालयांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. हिंदी, इंग्रजी आणि कन्नड भाषेत हे धमकीचे मेसेज मिळाले आहेत. हा मेसेज मिळाल्यानंतर पुजारी यांनी लखनऊमधील मडिगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा – गुजरातमध्ये पाकिस्तानी बोटीतून २५० कोटींचे हेरॉइन जप्त; एटीएसची धडक कारवाई

हिंदी, इंग्रजी आणि कन्नड भाषेत धमकी
नीळकंठ पुजारी हे सुलतानपूर येथील एका महाविद्यालयात प्रोफेसर म्हणून काम करतात. आरएसएस (RSS) चे जुने स्वयंमसेवक असून अलीगंज येथील आरएसएस सोबत ते काम करतात. रविवारी ५ मे रोजी रात्री त्यांना एका विदेशी मोबाईल नंबरवरून व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज आला. त्यात हिंदी, इंग्रजी आणि कन्नड भाषेत आरएसएसचे कार्यालये उडवून देण्याच्या धमक्या देण्यात आल्या होत्या.

या धमकीनंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अशा धमक्या येत असतात. त्यासाठी सरकार समर्थ असल्याचे राऊत म्हणाले आहेत.