लक्स कोझी अंडरवेअर हा भारतीय गुप्तहेर असल्याचा पुरावा : पाकचा हास्यास्पद दावा

पाकिस्तानी तपास यंत्रणाची सोशल मीडियावर खिल्ली

पाकिस्तानी पोलिसांनी बुधवारी एका भारतीय गुप्तहेरास पकडल्याचा दावा केला आहे. तर स्थानिक माध्यमांच्या मते पोलिसांचे म्हणणे आहे की, पकडण्यात आलेल्या या व्यक्तीने आपण भारतीय गुप्तहेर असल्याचे मान्य केले आहे. राजू लक्ष्मण असे या व्यक्तीचे नाव असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे तो भारतीय गुप्तहेर आहे हे सिद्ध करण्यासाठी चक्क त्याची ‘लक्स कोझी अंडरवेअर ‘ याचा सर्वात मोठा पुरावा असल्याचे सांगण्यात आल्याने, पाकिस्तानी तपास यंत्रणा आता सर्वत्र ट्रोल होत आहेत.

या व्यक्तीला पकडले गेले तेव्हा त्याच्या अंगात लक्स कोझी अंडरवेअर होती व हा एक भारतीय ब्रॅण्ड असल्याचे पाकिस्तानी पोलिसांनी म्हटले आहे. तर यावरून राजू लक्ष्मण हा एक भारतीय गुप्तहेर आहे व तो पाकिस्तानात हेरगिरीसाठी आला होता, हे सिद्ध होत असल्याचाही दावा पाकिस्तानी पोलिसांनी केला आहे. पाकिस्तानी पोलिसांच्या या माहितीनंतर सोशल मीडियावर त्यांची जोरदार खिल्ली उडवली जात आहे.

वॉशिंग्टन पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार हा कथित भारतीय गुप्तहेर पाकिस्तानातील पूर्व पंजाब प्रांतात हेरगिरी करत होता. पाकिस्तानात हेरगिरी करणाऱ्यास मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाते. राजू लक्ष्मण यास बुधवारी डेरा गाजी खान जिल्ह्यातील राखी गज भागात हेरगिरी करताना अटक करण्यात आली आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की, तो बलुचिस्तानमार्गे डेरा गाजी खान भागात प्रवेश करत होता. हा तोच प्रांत आहे ज्या ठिकाणी पाकिस्तानने सांगितल्याप्रमाणे कुलभूषण जाधव यांना अटक केली गेली होती. दरम्यान राजू लक्ष्मण यास पुढील चौकशीसाठी अज्ञात स्थळी पाठवण्यात आले असल्याची माहिती आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Lux cozy underwear is evidence of indian detective paks funny claim msr

ताज्या बातम्या