अयोध्येत राम मंदिर भक्तांसाठी खुले झाल्यानंतर मंदिरासाठी विविध वस्तू भक्तांकडून दिल्या जात आहेत. गुजरातमधून भली मोठी अगरबत्ती देण्यात आली, उत्तर प्रदेशच्या जलेसर शहरातून पाच फुटाची घंटा मंदिराला अर्पण करण्यात आली होती. आता महाराष्ट्रातील भक्तही मागे नाहीत. नवी मुंबईतील भक्तांनी राम मंदिराला एक भली मोठी तलवार देऊ केली आहे. नवी मुंबईतील राम भक्त निलेश अरुण साकर यांनी ही तलवार दिली आहे.

काय आहेत तलवारीची वैशिष्टे?

निलेश साकर यांनी एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले, मी खूप वर्षांपासून ऐतिहासिक शस्त्र गोळा करण्याचा छंद जोपासत आहे. मी अनेक ठिकाणी या शस्त्रांचं प्रदर्शनही भरविले होते. मी रामलल्लासाठी एक तलवार भेट घेऊन आलो आहे. या तलवारीला नंदक खड्ग (भगवान विष्णूची तलवार) असेही म्हणतात. या तलवारीचे खास वैशिष्टे म्हणजे या तलवारीची उंची ७ फूट ३ उंच असून तिचे वजन ८० किलो एवढे आहे.

What Sharad Pawar Said?
शरद पवारांचं वक्तव्य, “रामाच्या मंदिरात सीतेची मूर्ती का नाही?, महिलांची नाराजी…”
Who holds the keys to the ancient treasures of Tuljabhavani Devi temple
कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या पुरातन खजिन्याच्या चाव्या कोणाकडे?
Ram Navami 2024 Sury Tilak Festival
Ram Navami: अयोध्येत प्रभू रामाच्या मूर्तीचा सूर्यतिलक! डोळ्यांचं पारणं फेडणारा सोहळा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी
Nagpur, people poisoned,
नागपूर : कोराडीच्या महालक्ष्मी जगदंबा मंदिरात २५ जणांना विषबाधा

तलवारीची आणखी वैशिष्टे सांगताना निलेश म्हणाले की, या तलवारीला निरखून पाहिल्यास आपल्याला दिसेल की, ही तलवार भगवान विष्णू यांना वाहिलेली आहे. तलवारीवर दशावताराची चिन्ह दिसत आहेत. तलवार लोखंडापासून तयार करण्यात आली असून त्याची मूठ पितळीची आहे. त्यावर सोन्याचा मुलामा चढवला आहे. ही तलवार बनविण्यासाठी दीड महिन्याचा काळ लागला, असेही निलेश यांनी सांगितले.

हिंदू पुराणानुसार भगवान विष्णूच्या दहा अवतारांना दशावतार म्हटले जाते. एएनआय वृत्तसंस्थेने दशावताराबाबत माहिती देताना म्हटले की, हिंदू समाजात या दशावताराला अनन्य साधारण महत्त्व आहे. पृथ्वीवर अधर्माचा नाश करून धर्माची स्थापना करण्यासाठी भगवान विष्णूने वेळोवेळी विविध अवतार घेतले, त्याला दशावतार म्हटले जाते.

सोमवार २२ जानेवारी रोजी राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर बुधवारी अयोध्येत भक्तांचा जनसागर उसळलेला पाहायला मिळाला. अयोध्येत कडाक्याची थंडी आणि दाट धुके असतानाही मंदिरासमोरील रामपथावर आणि मंदिराच्या आवारात असंख्य भक्त रांगेत उभे राहिलेले पाहायला मिळाले. भक्तांमध्ये सर्व वयोगटातील नागरिक दिसत होते. जय श्री रामच्या जयघोषाने अवघी अयोध्यानगरी दुमदुमलेली पाहायला मिळत आहे.