एपी, स्ट्रासबर्ग (फ्रान्स)

गेल्या वर्षी इराणमध्ये पोलीस कोठडीत मरण पावलेल्या महसा अमिनी या २२ वर्षांच्या कुर्दिश- इराणी तरुणीला गुरुवारी युरोपीय महासंघाचा सर्वोच्च मानवाधिकार पुरस्कार प्रदान करण्यात आला. या तरुणीच्या मृत्यूमुळे इराणमधील पुराणमतवादी धर्मसत्ताक राज्यपद्धतीच्या विरोधात जगभरात निदर्शने करण्यात आली होती.सोव्हिएत रशियातील बंडखोर अँद्रेई साखारोव्ह याच्या नावाने असलेला युरोपीय महासंघाचा हा पुरस्कार, मानवाधिकार आणि मूलभूत स्वातंत्र्य यांचे संरक्षण करणाऱ्या व्यक्ती किंवा गटांसाठी १९८८ साली स्थापन करण्यात आला. नोबेल पुरस्कार विजेता असलेला साखारोव्ह १९८९ साली मरण पावला होता.

 हिजाब घालणे अनिवार्य करणाऱ्या इराणच्या कायद्याचे कथितरीत्या उल्लंघन केल्याबद्दल अमिनी हिला अटक करण्यात आली होती व नंतर पोलीस कोठडीत तिचा मृत्यू झाला. तिचा ‘भीषण खून’ हा कलाटणी देणारा टप्पा ठरला व तो दिवस ‘कलंकित दिवस’ म्हणून ओळखला जाईल, असे युरोपीय महासंघाचे अध्यक्ष रॉबर्टा मेत्सोला म्हणाले.

“काँग्रेस सत्तेत आल्यावर जातीनिहाय जनगणना करू”, निवडणुकीआधी राहुल गांधींचं जनतेला आश्वासन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

 या वर्षी अंतिम यादीत समावेश करण्यात आलेल्यांमध्ये निकारागुआतील मानवाधिकारांसाठी लढा देणाऱ्या विल्मा नुनेझ डी एस्कॉर्सिआ आणि रोमन कॅथलिक धर्मगुरू रोलँडो अल्वारेझ, तसेच ‘मुक्त, सुरक्षित व कायदेशीर गर्भपातासाठी’ लढय़ाचे नेतृत्व करणाऱ्या पोलंड, एल साल्वाडोर व अमेरिका येथील तीन महिलांचा समावेश होता.