मणिपूरमधील हिंसाचाराच्या वेगवेगळ्या बातम्या येत आहेत. या बातम्या संतप्त करणाऱ्या आहेत. आज मणिपूरमधून आणखी एक चीड आणणारी बातमी समोर आली आहे. सीमा सुरक्षा दलातील (बीएसएफ) एक जवानाला मणिपूरमधील राशनच्या दुकानात स्थानिक महिलेशी छेडछाड केल्याच्या आरोपाखाली निलंबित करण्यात आलं आहे. बीएसएफच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याबाबतची माहिती दिली आहे. बीएसएफ जवान स्थानिक महिलेची छेड काढतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत हेड कॉन्स्टेबल सतीश प्रसाद बीएसएफच्या गणवेशात दिसतोय. तसेच तो दुकानातील महिलेशी असभ्य वर्तन करत आहे.

बीएसएफच्या अधिकाऱ्याने सांगितलं की ही घटना २० जुलै रोजीची असून इम्फाळ पश्चिम जिल्ह्यात घडली आहे. या घटनेप्रकरणी तक्रार प्राप्त झाल्यावर सीमा सुरक्षा दलाने तपास करून त्याच दिवशी या जवानाला निलंबित केलं आहे. अधिकाऱ्याने सांगितलं की, बीएसएफच्या १०० व्या बटालियनशी संबंधित हेड कॉन्स्टेबलविरुद्ध न्यायालयीन चौकशीची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. अशा प्रकारची कृत्य सहन केली जाणार नाहीत. याप्रकरणी निष्पक्ष तपास केला जाईल.

E-communication of 4500 prisoners with their families
साडेचार हजार कैद्यांचा कुटुंबीयांशी ‘ई-संवाद’
Summer desi jugaad
उष्णतेपासून संरक्षणासाठी रिक्षाचालकाचा भन्नाट देशी जुगाड; रिक्षाच्या छतावरील काम पाहून कराल कौतुक!
china people punished for not paying debt
जीवनावश्यक वस्तू खरेदी करणेही कठीण; कर्ज फेडू न शकणाऱ्यांना चीन कशी शिक्षा करत आहे?
mumbai, KEM Hospital, Artificial Insemination Center, Project Stalled, Election Code of Conduct, child, Infertility, husband wife, couple for Artificial Insemination, mumbai KEM Hospital,
मुंबई : ‘केईएम’च्या कृत्रिम गर्भधारणा केंद्राला आचारसंहितेचा फटका

हे ही वाचा >> भारत-पाकिस्तान, हिंदू-मुसलमान… दोघांनाही सीमा हैदर का नको?

भारताच्या इशान्येकडील राज्य मणिपूरमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून हिंसाचार सुरू आहे. गेल्या आठवड्यात मणिपूरमधील एक व्हिडीओ व्हायरल झाला. ज्यामध्ये तिथल्या कुकी समुदायाच्या दोन महिलांची विवस्त्र करून धिंड काढल्याचे आणि त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करून त्यांना ठार मारल्याची बातमी समोर आली. महिलांची विवस्त्र धींड काढल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर देशभरातून संतापाची लाट उसळली आहे. या घटनेमुळे संपूर्ण देशाचं आणि प्रसारमाध्यमांचं लक्ष आता मणिपूरकडे वळलं आहे. त्यामुळे तिथल्या हिंसाचाराच्या वेगवेगळ्या घटना समोर येऊ लागल्या आहेत.