डिसेंबर महिन्यात दिल्लीतील एका बसमध्ये तरुणीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेतील आरोपींना देहान्त शासनाची शिक्षा व्हावी यासाठी एकीकडे न्यायालयीन लढाई सुरू आहे. मात्र असे असतानाही देशभर महिलांवर होणारे अत्याचार व बलात्काराचे प्रकार तसूभरही कमी झालेले नाहीत. येथील कीर्ती अफगाणा गावात विवाहितेवर चार जणांनी बलात्कार केल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
मजुरी करणारा आपला पती घरी न आल्याने त्याच्या शोधासाठी त्याची २४ वर्षीय पत्नी २६ जानेवारीला रात्री घराबाहेर पडली. त्यावेळी रस्त्यात उभ्या असलेल्या चार जणांनी तिला जवळच्या शेतात नेऊन तिच्यावर बलात्कार करून याबाबत तोंड उघडल्यास ठार मारण्याची धमकीही दिली. या विवाहितेच्या आईने २८ जानेवारी रोजी याबाबतची तक्रार पोलिसांकडे दाखल केली आहे. पोलिसांनी याची दखल घेताना मनदीप मसीह, तरलाब सिंह, हरप्रीत सिंह आणि जस्सी या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मात्र, अद्याप कोणालाही अटक झाली नसल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 30th Jan 2013 रोजी प्रकाशित
पंजाबमध्ये सामूहिक बलात्कार
डिसेंबर महिन्यात दिल्लीतील एका बसमध्ये तरुणीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेतील आरोपींना देहान्त शासनाची शिक्षा व्हावी यासाठी एकीकडे न्यायालयीन लढाई सुरू आहे. मात्र असे असतानाही देशभर महिलांवर होणारे अत्याचार व बलात्काराचे प्रकार तसूभरही कमी झालेले नाहीत.
First published on: 30-01-2013 at 12:05 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Married woman gangraped in punjab