टर्कीमधील इस्तंबूल येथे रविवारी भीषण स्फोट झाल्याची घटना घडली. या घटनेत आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाला असून जवळपास ८१ जण जखमी झाले आहेत. जखमींवर इस्तंबूलमधील वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. इस्तंबूलमधील तकसीम भागात हा स्फोट झाला आहे. टर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यीप एर्दोगान यांनी या हल्ल्यानंतर दु:ख व्यक्त करत दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले आहे.

हेही वाचा >>> मोठी बातमी! जितेंद्र आव्हाड देणार आमदारकीचा राजीनामा, ट्वीटद्वारे केलं जाहीर

tankers, Tanker inspection drive,
टॅंकरच्या बेदरकारपणाला आवर, अपघात दुर्घटनेनंतर वाहतूक विभागाकडून टॅंकर तपासणी मोहीम
Malaysia Military Helicopters Crash
मलेशियामध्ये दोन लष्करी हेलिकॉप्टरची हवेत भीषण धडक; १० जणांचा मृत्यू, घटनेचा व्हिडीओ समोर
four people drowned, died, Vasai, Mira Road
वसई आणि मिरा रोड मध्ये दुर्घटना, एकाच दिवशी ४ जणांचा बुडून मृत्यू
man killed in dispute between two groups over trivial reason in thane
ठाणे : क्षुल्लक कारणावरून दोन गटातील वादातून एकाची हत्या

नेमकं काय घडलं?

टर्कीमधील स्थानिक माध्यमांनुसार येथील इस्तंबूलमधील तकसीम या भागात लोकांची वर्दळ असलेल्या एका रस्त्यावर मोठा स्फोट झाला. स्फोटाआधी या रस्त्यावरून लोक मोठ्या प्रमाणात येत-जात होते. ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. स्फोट झाल्यानंतर रस्त्यावरील लोक सैरावैरा पळताना दिसत आहेत. रविवारी संध्याकाळी साधारण ४ वाजता ही स्फोटाची घटना घडली.

हेही वाचा >>> तामिळनाडू सरकारने EWS आरक्षण नाकारलं; भाजपासह AIADMKचा सर्वपक्षीय बैठकीवर बहिष्कार

भारताने व्यक्त केलं दु:ख

या स्फोटानंतर भारताने आपल्या संवेदना व्यक्त केल्या आहेत. ‘टर्कीमध्ये झालेल्या स्फोटात अनेकांचा मृत्यू झाला. तसेच अनेकजण जखमी झाले. या दुर्दैवी घटनेत मृत्यू झालेल्या लोकांप्रती आम्ही शोक व्यक्त करतो. तसेच जखमी झालेल्या नागरिकांप्रती आम्ही सहानुभूती व्यक्त करतो. जखमी व्यक्ती लवकरात लवकर बऱ्या व्हाव्यात अशी प्रार्थना आहे,’ असे ट्वीट भारतीय परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी केले.