Guwahati-Chennai IndiGo Flight Diverted To Bengaluru: गुवाहाटीहून चेन्नईला जाणाऱ्या इंडिगोच्या एका विमानाला गुरुवारी रात्री बंगळुरू विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावे लागले. विमानात पुरेसे इंधन नसल्याने पायलटने एअर ट्रॅफिक कंट्रोलला ‘मे डे’ कॉल केला होता.

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, विमान क्रमांक ६ई-६७६४ (ए३२१) च्या पायलटने संध्याकाळी ७:४५ वाजता चेन्नईत विमान उतरवण्याचा प्रयत्न केला, परंतु लँडिंग गिअर धावपट्टीला स्पर्श (बॉल्क्ड लँडिंग) केल्यानंतर माघारी वळण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, गुवाहाटी विमानतळावरून या विमानाने सायंकाळी ४:४० वाजता उड्डाण केले होते. या विमानात १६८ प्रवासी होते.

विमानाच्या कॅप्टनने बेंगळुरू विमानतळ सुमारे ३५ मैल अंतरावर असताना ‘मे डे’ कॉल पाठवला होता. एका सूत्राने सांगितले की, त्या वेळी विमानाची उतरणीची प्रक्रिया स्थिर नसल्यासारखी भासत होती. एका प्रवाशाच्या हवाल्याने टाइम्स ऑफ इंडियाने वृत्त दिले आहे की, अचानक झालेल्या या घटनेमुळे अनेक प्रवासी घाबरले होते.

एअर ट्रॅफिक कंट्रोलमधील सूत्रांनी या वृत्ताला दुजोरा दिला की, चेन्नईमध्ये दुसऱ्यांदा लँडिंग करण्याचा प्रयत्न करण्याऐवजी, वैमानिकाने विमान बंगळुरूला नेण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, इंडिगोने अद्याप याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही.

मेडे कॉल म्हणजे काय?

‘मे डे’ कॉल हा आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त आपत्कालीन सिग्नल आहे, जो जीवघेण्या संकटाच्या वेळी वापरला जातो, विशेषतः समुद्र आणि हवाई वाहतुकीत. हा शब्द फ्रेंच वाक्यांश “माईदेझ” पासून आला असून, त्याचा अर्थ “मला मदत करा” असा होतो.

अहमदाबाद विमान अपघात

दरम्यान काही दिवसांपूर्वी अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या एका विमानाचा भीषण अपघात झाला होता. त्यामध्ये २४१ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या विमान अपघातानंतर, हवाई प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. याचबरोबर जगभरातील विविध भागांत भू-राजकीय तणावासारख्या इतर घटकांमुळेही प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आयसीआयसीआय सिक्युरिटीजच्या एका अहवालात म्हटले आहे की, जूनमध्ये विमान वाहतूक मंत्रालयाच्या प्रवाशांच्या प्रवासाच्या आकडेवारीत घट झाल्याचे दिसून आले आहे.