शाकाहारी बर्गरऐवजी मांसाहारी बर्गर दिल्याबद्दल ग्राहकाला १५ हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी, असा आदेश ग्राहक मंचाने ‘फास्ट फूड जायंट’ अशी बिरुदावली मिरविणाऱ्या मॅकडोनाल्डला दिला.शाकाहारी बर्गरऐवजी मांसाहारी बर्गर देणे हा बर्गर पोहोचविणाऱ्या कर्मचाऱ्याचा निष्काळजीपणा आहे, त्याची वर्तणूक सेवेतील कमतरता या सदरात मोडते, असे ग्राहक निवारण कक्षाने म्हटले आहे.
ग्राहकाने केलेल्या तक्रारीची दखल घेऊन ग्राहक निवारण कक्षाने सदर ग्राहकाला नुकसानभरपाईपोटी १० हजार रुपये आणि न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्यापोटी आलेला खर्च म्हणून पाच हजार रुपये असे एकूण १५ हजार रुपये देण्याचे आदेश मॅकडोनाल्डला दिले.

पार्किंगजवळ अडवली गाडी, झाडल्या ५० गोळ्या; हरदीपसिंग निज्जरच्या हत्येचा थरारक घटनाक्रम वाचा!

“ही तर हद्द झाली…,” लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी परिणीती चोप्रा ट्रोल, अभिनेत्रीबद्दल नाराजी व्यक्त करत नेटकरी म्हणाले…

“माझी मुलगीही ‘Awesome’ आहे, कारण…” जागतिक कन्या दिनानिमित्त अमृता फडणवीसांची खास पोस्ट

“पंतप्रधान मोदींचं ‘ते’ विधान क्लेशदायक”, शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका; दिले १९९३ च्या घडामोडींचे दाखले!