गेल्या काही काळात सीमावाद किंवा चिनी उत्पादनांची भारतीय बाजारपेठेतील वाढती घुसखोरी यासारख्या मुद्द्यांमुळे दोन्ही देशांमध्ये काहीसे तणावाचे वातावरण आहे. मात्र, या दोन्ही देशांनी एकमेकांना सहकार्य करायचे ठरवल्यास चमत्कार पाहायला मिळू शकतो, याचा प्रत्यय नुकताच आला. भारत आणि चीन यांनी मिळून ‘मित्रा’ हा अद्ययावत रोबोट तयार केला. बंगळुरूमधील इन्व्हेन्टो या कंपनीने या रोबोटचे डिझाईन आणि सॉफ्टवेअर विकसित केले. मात्र, चीनमध्ये उपलब्ध असणाऱ्या उच्चप्रतीच्या हार्डवेअर्सचे महत्त्व लक्षात घेता या रोबोटची बांधणी चीनमध्ये करण्यात आली. चीनमधील शेनझेन आणि डाँगुआन येथील कारखान्यात या रोबोटला मूर्त स्वरूप देण्यात आले.

कॅनरा बँकेच्या बंगळुरू येथील शाखेत ‘मित्रा’ हा नावाचा हा रोबोट सध्या प्रायोगिक तत्त्वावर काम करत आहे. लवकरच भारतातील रुग्णालये आणि चित्रपचगृहांमध्येही ‘मित्रा’ पाहायला मिळेल. हा रोबोट रूग्णांचे स्वागत करणे, त्यांची वैद्यकीय पार्श्वभूमी सांगणे, अशी कामे करू शकतो. तर चित्रपटगृहात आलेल्या प्रेक्षकांना त्यांनी पूर्वी बघितलेल्या चित्रपटांच्याआधारे कोणता चित्रपट बघायचा, यासाठी हा रोबोट सल्ला देऊ शकतो.

Portfolio RATHMANI METALS AND TUBES LIMITED
माझा पोर्टफोलियो : ‘पोर्टफोलिओ’ला देई पोलादी ताकद ! रत्नमणी मेटल्स अँड ट्यूब्स लिमिटेड
Boult launches smart home audio devices first soundbars Bassbox X Series in India only 4999 rupees new sound system
फक्त पाच हजारांत घरी आणा Boult चा साउंडबार; टीव्ही, कॉम्प्युटर, मोबाइललाही करता येईल कनेक्ट
Vivo company New Smartphone T3x 5G launch in India on Know About design and price range of this upcoming model
50MP कॅमेरा अन् फास्ट चार्जिंग सपोर्टसह विवोचा ‘हा’ स्मार्टफोन होणार लाँच; किंमत फक्त…
Yamaha introduces vibrant new color options across the MT15 V2 Fascino and Ray ZR portfolios Know Features And price
ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह यामाहा इंडियाने ‘या’ दुचाकींना केलं उपडेट; पाहा कलर ऑप्शन…

काही दिवसांपूर्वीच डाँगुआन येथील कारखान्यात ‘मित्रा’चे चार प्रोटोटाईप बनवण्यात आले. यासाठी शेनझेन येथून सर्किट बोर्डस मागवण्यात आले होते. त्यानंतर हे रोबोट भारतात रवाना करण्यात आले. इन्व्हेन्टोच्या भारतातील प्रयोगाला यश आल्यास याच कारखानांमध्ये ‘मित्रा’चे आणखी १०० प्रोटोटाईप तयार केले जातील, अशी माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली.

‘मित्रा’साठी वापरण्यात आलेले ८० टक्के सॉफ्टवेअर हे बंगळुरूतच विकसित करण्यात आले आहे. मात्र, चीनमध्ये उपलब्ध असणाऱ्या उच्च प्रतीच्या हार्डवेअर्सचा विचार करता आम्ही त्याठिकाणी रोबोटची बांधणी करण्याचा निर्णय घेतला. उत्पादन खर्च कमी करण्यासाठी नव्हे तर चांगल्या दर्जाचे उत्पादन करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती इन्व्हेन्टोचे सीईओ बालाजी विश्वनाथन यांनी दिली. अनेक चिनी व्यावसायिक या रोबोटच्या निर्मितीसाठी गुंतवणूक करण्यासाठी उत्सुक असल्याचेही त्यांनी सांगितले.