दिल्लीमधील सामूहिक बलात्काराचे प्रकरण ताजे असतानाच केवळ चौदा वर्षांच्या मतिमंद मुलीवर तिच्या मेहुण्यानेच सतत ६ महिने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे.सदर मुलीच्या शेजाऱ्यांनी शनिवारी रात्री ‘त्या’ नराधमास रंगेहाथ पकडल्याने ही बाब उजेडात आली. देव कुमार मंडल असे आरोपीचे नाव असून तो ४५ वर्षांचा आहे. त्याला येथील जवाहर नगर पोलिसांच्या हवाली करण्यात आले.
सदर इसम पीडित मुलीच्या घरी अनेकदा येत असे आणि ती एकटी असताना तिच्यावर बळजबरी करीत असे. या मुलीची आईसुद्धा मतिमंद असून ती बंगालमध्ये आपल्या माहेरी राहते, तर तिचे वडील माथाडी कामगार असल्याने तेही घराबाहेरच असत. त्या मुलीने दिलेल्या जबानीत सदर इसमाने आपल्याला ही बाब उघड केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती, असे सांगितले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 30th Dec 2012 रोजी प्रकाशित
मतिमंद मुलीवर सतत ६ महिने बलात्कार
दिल्लीमधील सामूहिक बलात्काराचे प्रकरण ताजे असतानाच केवळ चौदा वर्षांच्या मतिमंद मुलीवर तिच्या मेहुण्यानेच सतत ६ महिने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे.सदर मुलीच्या शेजाऱ्यांनी शनिवारी रात्री ‘त्या’ नराधमास रंगेहाथ पकडल्याने ही बाब उजेडात आली.
First published on: 30-12-2012 at 01:36 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mentally challenged minor girl raped by kin for 6 months