एपी, न्यूयॉर्क : फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपची मातृकंपनी ‘मेटा’ने जगभरातील तब्बल ११ हजार कर्मचारी (एकूण मनुष्यबळाच्या १३ टक्के) कमी करण्याची घोषणा बुधवारी केली. यासंदर्भात कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झकरबर्ग यांनी सर्व कर्मचाऱ्यांना पत्र पाठवले असून, घटलेला महसूल आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील वाढत्या समस्या हे कारण देण्यात आले आहे.

  गेल्याच आठवडय़ात ट्विटरचे नवे मालक इलॉन मस्क यांनी सुमारे साडेतीन हजार कर्मचारी कपातीची प्रक्रिया सुरू केली. त्यानंतर आता जगातील सर्वात मोठी समाजमाध्यम कंपनी असलेल्या ‘मेटा’नेदेखील त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवले आहे. ‘‘करोनाची साथ संपल्यानंतरही उत्पन्न वाढ कायम राहील, हे गृहीत धरून आक्रमकपणे नोकरभरती केली. मात्र दुर्दैवाने माझ्या अपेक्षेप्रमाणे गोष्टी घडल्या नाहीत,’’ असे झकरबर्ग यांनी कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

Vodafone Idea Announces fpo, Rs 18000 Crore, Starting from 18 april 2024, each share value 10 to 11 rs, telecom company fpo, vodafone idea telecom, finance news, finance article,
व्होडा-आयडियाची समभाग विक्रीतून १८,००० कोटी उभारण्याची घोषणा, १८ एप्रिलपासून प्रति समभाग १०-११ रुपयांनी विक्री
Delayed purchase of passenger vehicles by 3 lakh 22 thousand 345 customers in the month of March
प्रवासी वाहनांच्या विक्रीत घट, मार्च महिन्यात ३ लाख २२ हजार ३४५ ग्राहकांकडून खरेदी लांबणीवर
Apple Company has decided to fires 600 employees in California
‘ॲपल’कडून ६०० कर्मचाऱ्यांना नारळ; कंपनीकडून करोनानंतरची पहिलीच मोठी कर्मचारी कपात
ED Seizes Assets more than Rs 24 Crore from VIPS Group Owner Vinod Khute
व्हीआयपीस् ग्रुपच्या विनोद खुटे याच्याशी संबंधित मालमत्तेवर ईडीची टाच, ५८ बँक खात्यातील रक्कम व ठेवींचा समावेश

‘मेटा’ने सलग दोन तिमाहींमध्ये महसुलात मोठी घट नोंदवली आहे. कंपनीने ‘मेटाव्हर्स’ या नव्या संकल्पनेत तब्बल १० अब्ज डॉलरची गुंतवणूक केल्यामुळे गुंतवणूकदारांनी चिंता व्यक्त केली आहे. याचाही परिणाम कंपनीच्या महसूल आणि उत्पन्नावर झाला आहे. याखेरीज अ‍ॅपलच्या खासगीकरण साधनांमुळे फेसबुक, इन्स्टाग्राम, स्नॅप यांना वापरकर्त्यांच्या परवानगीशिवाय त्यांच्यापर्यंत पोहोचता येत नाही. याचाही फटका मेटा कंपनीला बसतो आहे. तरुणांमध्ये ‘टिकटॉक’ अधिक लोकप्रिय होत असून त्याची फेसबुकला तीव्र स्पर्धा आहे.

काय घडले?

करोनाकाळात अनेक कंपन्यांनी मोठय़ा प्रमाणात नोकरभरती केली होती. साथ ओसरल्यानंतरही व्यवसाय कायम राहील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, आता अनेक व्यवहार प्रत्यक्षात सुरू झाल्यामुळे ‘ऑनलाइन’ व्यवहारांचे प्रमाण घटले आहे. त्यामुळे सर्वच माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांना तीव्र स्पर्धेला तोंड द्यावे लागत आहे.

वाढती स्पर्धा आणि घटणाऱ्या जाहिरातींमुळे आपला महसूल अपेक्षेपेक्षा कितीतरी प्रमाणात घटला आहे. त्यामुळे कर्मचारी कपात करावी लागत आहे.

– मार्क झकरबर्ग, मुख्य कार्यकारी अधिकारी, मेटा