भारतीय हवाई दलाचे बिसन मिग-२१ जातीचे विमान शनिवारी नलिया हवाई तळाजवळ कोसळले. मात्र सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. विमान कोसळण्यापूर्वीच वैमानिकाने बाहेर उडी घेतल्याने तोही या दुर्घटनेतून बचावला. या विमानाची नियमित चाचणी घेतली जात असताना ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. विमान कोसळताना त्यामध्ये आग लागली नव्हती, असे ही घटना प्रत्यक्ष पाहणाऱ्यांनी आणि वनाधिकारी अतुल दवे यांनी सांगितले.जखमी वैमानिकाला भुजच्या लष्करी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. गेल्या ऑगस्ट महिन्यात मिग-१७ जातीच्या दोन विमानांची हवेतच टक्कर झाली होती आणि त्यामध्ये पाच अधिकाऱ्यांसह भारतीय हवाई दलाचे नऊ कर्मचारी ठार झाले होते.
संग्रहित लेख, दिनांक 25th Nov 2012 रोजी प्रकाशित
मिग-२१ कोसळले
भारतीय हवाई दलाचे बिसन मिग-२१ जातीचे विमान शनिवारी नलिया हवाई तळाजवळ कोसळले. मात्र सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. विमान कोसळण्यापूर्वीच वैमानिकाने बाहेर उडी घेतल्याने तोही या दुर्घटनेतून बचावला.
First published on: 25-11-2012 at 05:19 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mig 21 bison crashes in gujarat no casualties