तामिळनाडूत भारतीय हवाई दलाचं हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालं आहे. कोईम्बतूर आणि सुलूरदरम्यान कुन्नूर येथे हे Mi- 17V5 हेलिकॉप्टर कोसळलं आहे. हेलिकॉप्टरमध्ये संरक्षण दलाचे प्रमुख जनरल बिपिन रावत यांच्यासोबत अनेक वरिष्ठ अधिकारी प्रवास करत होते. या भीषण दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान बिपिन रावत यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांच्या प्रकृतीसंबंधी अधिकृत माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.

एएनआयच्या वृत्तानुसार, तामिळनाडूत कोईम्बतूर आणि सुलूरदरम्यान कुन्नूर येथे हवाई दलाचं हेलिकॉप्टर कोसळून दुर्घटना झाली. लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह संरक्षण दलाचे प्रमुख जनरल बिपिन रावत आणि त्यांचे कुटुंबीय या Mi- 17V5 हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते. हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाल्यानंतर त्याला आग लागली. यानंतर घटनास्थळी बचावकार्य सुरु करण्यात आलं. स्थानिकदेखील या बचावकार्यात सहभागी झाले होते. अपघात झालेलं ठिकाण डोंगराळ भागामध्ये असल्याने तिथे पोहचण्यास अडचणी येत होत्या.

अमेरिकेत शिक्षण ते भारताचे पहिले संरक्षण प्रमुख व्हाया गोरखा बटालियन… जाणून घ्या बिपीन रावत यांच्याबद्दल

या हेलिकॉप्टरमधून एकूण १४ जण प्रवास होते. यामध्ये बिपिन रावत यांच्यासोबत त्यांच्या पत्नीदेखील हेलिकॉप्टरमध्ये होत्या.

हवाई दलाकडून चौकशीचा आदेश

हवाई दलाने बिपिन रावत या दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते याला दुजोरा देताना चौकशीचे आदेशही देण्यात आल्याचं सांगितलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुर्घटनेचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र तांत्रिक कारणामुळे दुर्घटना झाल्याची प्राथमिक माहिती आहे.