जेडीएसचे नेते प्रज्ज्वल रेवण्णा यांच्या सेक्स स्कँडलमुळे कर्नाटकच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. सदर प्रकरण उजेडात आल्यानंतर प्रज्ज्वल रेवण्णा यांनी देशाबाहेर पळ काढला असला तरी त्यांचे वडील आणि जेडीएसचे आमदार एचडी रेवण्णा यांचाही या प्रकरणात सहभाग असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर आता नव्या घडामोडींनुसार कर्नाटकचे माजी मंत्री असलेल्या एचडी रेवण्णा यांच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे. रेवण्णा यांच्या निवासस्थानी घरकाम करणारी महिला बेपत्ता झाल्यानंतर या महिलेच्या मुलाने तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली. सदर महिलेचाही व्हिडीओ या सेक्स टेप स्कँडलमध्ये असल्याचे सांगितले जात आहे.

तरुणाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आमदार एचडी रेवण्णा आणि त्यांचा सहकारी सतीश बबण्णा यांच्याविरोधात अपहरण आणि इतर कलमाखाली गुन्हा दाखल केला. एफआयआरनुसार, सदर घटना २९ एप्रिलची आहे. बेपत्ता झालेली महिला रेवण्णा यांच्या होलेनारसिपुरा येथे असलेल्या फार्महाऊसवर घरकाम करत होती. सहा वर्ष सदर महिलेने रेवण्णा यांच्या घरी काम केले. त्यानंतर तीन वर्षांपूर्वी हे काम सोडून ती पुन्हा गावात रोजंदारीवर काम करू लागली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mla hd revanna booked in kidnapping case after woman in prajwal revanna sex tape goes missing kvg
First published on: 03-05-2024 at 14:18 IST