नरेंद्र मोदी हे भेदाभेद करणारे व्यक्तीमत्त असून, गुजरातचा विकास अतिरंजित पद्धतीने मांडला जात असल्याचा आरोप अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी केला. मोदी आणि भाजपवर चौफेर टीका करताना त्यांनी या निवडणुकीत जनता पुन्हा एकदा भाजपला धडा शिकवेल असा भाकित वर्तवले.
समान नागरिक कायदा, अयोध्या, कलम ३७० रद्द करणे हे मुद्दे भाजप पुन्हा उकरून काढत असल्याचा आरोपही केला. मोदी पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून भाजपने पुढे केल्यास काँग्रेसवर काय परिणाम होईल यावर थेट उत्तर देण्याचे चिदंबरम यांनी टाळले. आम्ही व्यक्तीगत पातळीवर नव्हे तर भाजपशी वैचारीक मुकाबला करणार आहोत. मोदींना प्रचारप्रमुख करताच भाजपमध्ये मोठय़ा प्रमाणात बंडाळी माजली होती हे सांगताना लालकृष्ण अडवाणींच्या राजीनामा नाटय़ाचा त्यांनी संदर्भ दिला.
संग्रहित लेख, दिनांक 1st Jul 2013 रोजी प्रकाशित
नरेंद्र मोदी हे भेदाभेद करणारे व्यक्तीमत्त – पी चिदंबरम
नरेंद्र मोदी हे भेदाभेद करणारे व्यक्तीमत्त असून, गुजरातचा विकास अतिरंजित पद्धतीने मांडला जात असल्याचा आरोप अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी केला. मोदी आणि भाजपवर चौफेर टीका करताना त्यांनी या निवडणुकीत जनता पुन्हा एकदा भाजपला धडा शिकवेल असा भाकित वर्तवले.

First published on: 01-07-2013 at 06:57 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Modi very divisive bjp will bite dust again chidambaram