गेल्या वर्षी ब्लू व्हेल नावाच्या एका इंटरनेट गेमने काळजीने थरकाप उडवला होता. आशाच प्रकारचा आणखी एक इंटरनेट गेम सध्या फेसबुक आणि व्हॉटस्अॅपवर आला आहे. लोकांमध्ये हा नवीन खेळ भीती निर्माण करत आहे. मोमो नावाचा गेम सध्या धुमाकूळ घालत असून सर्वांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. याचा भारातामध्ये सध्या फारसा प्रभाव पडत नसला तरी आपल्याकडे सोशल मीडियाचे वापरकर्ते कोट्यवधी आहेत. त्यामुळे हा इंटरनेटगेम भारतामध्ये प्रवेश करू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. ब्लू व्हेलप्रमाणेच या गेममुळे लॅटिन अमेरिकन देशांतील लोकांची झोप उडाली आहे. हा इंटरनेट गेम लहान मुलांना टार्गेट करतो. त्यामुळे सोशल मीडियावर तुम्ही जास्त वेळ घालवत असाल तर सावधानता बाळगा.

व्हॉटस्अॅप मोमो नावाचा एक क्रमांक आहे. जो शेअर केला जात आहे. हा नंबर जोडल्यानंतर चित्रातील चेहरा धडकी भरवणारा दिसतो. हा नंबर आपल्या मोबईलमध्ये सेव्ह केल्यानंतर, अशा अनेक गोष्टी आहेत ज्या लोकांवर आत्महत्या करण्यासाठी हळूहळू भाग पाडतात. मोमो गेमचा हा क्रमांक जपानचा असल्याचे बोलण्यात येतेय. मात्र सध्या याबाबत आणखी तपास सुरु आहे. मोमो नंबरला सर्वप्रथम फेसबुकवर पाहिले गेले, त्यानंतर अनेक लोकांनी दिलेल्या नंबरवर कॉल करण्याचा प्रयत्न केला. बातम्यांनुसार, मोमो वॉटसॅपवर दिसणारी भितीदायक चेहरा एका जपानी संग्रहालयात ठेवलेल्या पुतळ्याप्रमाणे आहे.

सायबर तज्ञांच्या मते मोमो चॅलेंजपासून एक नाही तर अनेक भीती आहेत. हा गेम लहान मुले आणि युवानां आपल्या जाळ्यात ओढतोय. वैयक्तिक माहिती त्यांच्याकडून घेतल्यानंतर पालकांना ब्लॅकमेल केले जाते. यामध्ये खंडणी मागितली जाते. त्याचप्रमाणे तणावग्रस्त वातावरण निर्मीती करुन आत्महत्या करण्यास भाग पाडले जातेय.

सोशल मीडियावर मोमो संपर्क क्रमांक व्हायरल झाल्यानंतर अनेक लोकांनी समान प्रोफाइल बनवले आहे. लॅब एक्सपर्ट तज्ज्ञांनी मोमो नंबर वाचण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचा उलगडा होऊ शकलेला नाही. ही संकल्पना कोणी आणि कुठे पसरली जात आहे, हे अद्याप समोर आलेले नाही.