Radhika Yadav’s Friend Himanshika Singh Post: हरियाणाची टेनिसपटू राधिका यादवची तिच्याच वडिलांनी हत्या केली होती. या हत्येनंतर क्रीडा विश्वास खळबळ उडाली. या हत्येचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. दरम्यान राधिका यादवची जवळची मैत्रिण असलेल्या हिमांशिका सिंह राजपूतने राधिकाच्या मृत्यूनंतर केलेल्या दाव्यांमुळे अनेक तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत. तसेच राधिकाच्या हत्येनंतर सोशल मीडियावर तिच्या वडिलांचे समर्थन करणाऱ्या अनेक पोस्ट शेअर होत असल्याबाबतही हिमांशिकाने नाराजी व्यक्त केली.

हिमांशिकाने राधिका यादवच्या हत्येनंतर दोन व्हिडीओ शेअर करत राधिकावर घरातून अनेक बंधने असल्याचे म्हटले होते. राधिकाला तिच्या घरातून एकटे सोडले जात नव्हते. तसेच कपड्याच्या निवडीबद्दल तिच्या कुटुंबियांकडून निर्देश दिले जात असत, असे दावे हिमांशिकाने केले होते. तसेच राधिका यादवचा खून होण्यापूर्वी तीन दिवस आधीपासूनच वडिलांनी हत्येची योजना बनविली होती, असाही धक्कादायक दावा हिमांशिकाने केला होता.

आता मंगळवारी (दि. २२ जुलै) हिमांशिकाने आणखी एक नवीन व्हिडीओ शेअर केला आहे. यात तिने आधीच्या व्हिडीओवर आलेल्या कमेंट्सचा उल्लेख केला आहे. ती म्हणाले, मागच्या आठवड्यात मी दोन व्हिडीओ शेअर केले होते. पण या व्हिडीओखाली आलेल्या कमेंट वाचून मला धक्काच बसला. अनेक कमेंट्समध्ये पुरूषांकडून एखा हत्येखोराचे समर्थन करण्यात येत आहे.

हिमांशिक पुढे म्हणाली, हे काही बरोबर नाही. पण न्याय दिला गेला पाहिजे. हे जग फक्त पुरुषांचे नाही, हे त्यांनी समजून घ्यायला हवे. या जगात महिलाही आहेत. महिला आपल्या हक्कांसाठी प्रतिकार करत राहतील आणि एकमेकांना साथ देतील.

काही कमेंट्समध्ये राधिका यादवचे वडील दीपक यादव यांना समर्थन देण्यात आले आहे. स्वतःच्या मुलीचा खून करणाऱ्या माणसाला काही जणांनी उघड समर्थन दिल्याचे हिमांशिकाने सांगितले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आरोपी वडील दीपक यादव आणि राधिकाच्या कुटुंबियांनी वर्षानुवर्ष राधिकाचा भावनिक छळ केल्याचा आरोप हिमांशिकाने केला होता. मात्र राधिकाच्या कुटुंबियांनी तिचे हे आरोप फेटाळून लावले होते. दरम्यान हिमांशिकाच्या व्हिडीओमुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागले असल्यामुळे अनेकांनी तिच्यावर टीकाही केली आहे.