एका परिचारिकेसह दोनजण मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी केलेल्या अॅसिड हल्ल्यात जखमी झाले.
त्यात पन्नास वर्षे वयाच्या विजयाकुमारी यांचा समावेश असून त्या प्राथमिक आरोग्य केंद्रात राहतात. त्यांनी मोटरबाईकवर त्यांच्या मित्राकडे रात्री लिफ्ट मागितली होती, असे पोलीस अधीक्षक सेंथिलकुमार यांनी सांगितले.
क्वार्टर्सच्या ठिकाणी पोहोचल्यावर हल्लेखोरांनी त्यांच्यावर अॅसिड फेकून ते फरार झाले. त्यात विजयाकुमारी या जखमी झाल्या आहेत. त्यांच्या दोन्ही डोळ्यांना भाजल्याच्या जखमा झाल्या आहेत. त्यांच्या मित्राचा खांदा भाजला आहे असे पोलिसांनी सांगितले आहे. त्यांना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
हल्ल्यामागचा हेतू समजू शकला नाही. काही खास पथके गुन्हेगारांना पकडण्यासाठी रवाना केली आहेत असे सेंथिलकुमार यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 1st Jan 2015 रोजी प्रकाशित
परिचारिके सह दोघांवर तामिळनाडूत अॅसिड हल्ला
एका परिचारिकेसह दोनजण मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी केलेल्या अॅसिड हल्ल्यात जखमी झाले.
First published on: 01-01-2015 at 03:11 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Namakkal nurse injured in acid attack by duo on bike