मुस्लिमांची टोपी घातल्याने कोणाच्याही धर्मावर परिणाम होत नाही, या शब्दांत अभिनेते रझा मुराद यांनी शुक्रवारी गुजरातचे मुख्यमंत्री नरेद्र मोदी यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला.
दोन वर्षांपूर्वी मुस्लिम धर्मगुरू सय्यद इमाम शाही सय्यद यांनी मोदी यांचे सदभावना उपोषण सुरू असलेल्या ठिकाणी जाऊन त्यांना मुस्लिमांची टोपी भेट देऊन ती घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, मोदींनी त्यावेळी ती टोपी घालण्यास नकार दिला होता. ईदनिमित्त भोपाळमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान सहभागी झाले होते. त्यांनी यावेळी मुस्लिमांची टोपी घातली होती. हेच औचित्य साधत रझा मुराद यांनी नाव न घेता मोदींवर निशाणा साधला. त्यांनी (मोदींनी) चौहान यांच्याकडून काहीतरी शिकले पाहिजे आणि मुस्लिमांची टोपी घालण्याला विरोध केला नाही पाहिजे, असे रझा मुराद म्हणाले. देशातील सर्वोच्च पदावर जायचे असेल, तर सर्व समाजाला बरोबर घेऊन जावे लागते, असा टोलाही त्यांनी मोदी यांना लगावला.
संग्रहित लेख, दिनांक 9th Aug 2013 रोजी प्रकाशित
मुस्लिम टोपी घातल्याने धर्मावर परिणाम होत नाही – रझा मुराद यांचा मोदींना टोला
मुस्लिमांची टोपी घातल्याने कोणाच्याही धर्मावर परिणाम होत नाही, या शब्दांत अभिनेते रझा मुराद यांनी शुक्रवारी गुजरातचे मुख्यमंत्री नरेद्र मोदी यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला.
First published on: 09-08-2013 at 03:47 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narendra modi learn some things from chouhan and does not show his aversion to skull caps says raza murad