नासाच्या अंतराळयानाला मंगळाच्या पृष्ठभागावर अलीकडच्या काळात तयार झालेली घळ सापडली आहे. गेल्या तीन वर्षांत मार्गिकेसारखा हा आकार तयार झाला असावा, असे वैज्ञानिकांनी सांगितले.
हाय रेझोल्युशन इमेजिंग सायन्स एक्सपिरिमेंट कॅमेऱ्याने नोव्हेंबर २०१० व मे २०१३ या काळात काढलेल्या छायाचित्रांवरून असे दिसून येते, की मंगळाच्या दक्षिण भागात उंच प्रदेशात घळईसारखा हा खोलगट भाग तयार झाला आहे. त्याची नेमकी वैशिष्टय़े मात्र हायराइज या कॅमेऱ्याने ५ नोव्हेंबर २०१० रोजी काढलेल्या छायाचित्रांतून स्पष्ट झालेली नाहीत.
मंगळावरील ही घळई पृथ्वीवरील नद्यांच्या मार्गिकांप्रमाणे दिसत असली तरी ती पाण्यामुळे कोरली गेलेली नाही. ती कार्बन डाय ऑक्साईडच्या धुक्यामुळे तयार झाली असावी. घळई किंवा दरीसारखा भाग मंगळावर दक्षिण गोलार्धात नवीन नाही, पण या घळईच्या टोकाकडे असलेल्या घटकांच्या घरंगळून खाली येण्याच्या क्रियेमुळेही नवीन घळईत खोलगट भाग तयार होत गेला असावा.
ही छायाचित्रे मंगळावरील पूर्ण वर्षांच्या कालावधीतील आहेत, त्यामुळे ती तेथील नेमक्या कुठल्या मोसमात तयार झाली असावीत याचा अंदाज आलेला नाही. मंगळाच्या इतर भागांतही असे खोलगट भाग आहेत.
तेथील निरीक्षणांवरून मात्र असे भूशास्त्रीय बदल हे हिवाळय़ात होत असावेत, कारण त्या वेळी कार्बन डाय ऑक्साईड हा थंड झालेला असतो, कारण त्या वेळी तापमान खूप कमी असते. हा कार्बन डाय ऑक्साईड पाण्यापेक्षा थंड होऊन त्याच्या धुक्याने हे घळईसारखे भाग तयार होत असावेत असा वैज्ञानिकांचा अंदाज आहे. मंगळावर पूर्वी अशाप्रकारे कालवेच तयार झाले होते व त्यातून पाणी वाहात होते.
अलीकडच्या काळात तयार झालेले हे घळईसारखे भाग कशामुळे तयार झाले असावेत याचे उत्तरही वैज्ञानिकांनी कार्बन डाय ऑक्साईडच्या बाष्पाच्या रूपात शोधले आहे व ते स्पष्टीकरण बरेचसे पटण्यासारखे आहे.
संग्रहित लेख, दिनांक 25th Mar 2014 रोजी प्रकाशित
मंगळावर अलीकडच्या घळीचा शोध
नासाच्या अंतराळयानाला मंगळाच्या पृष्ठभागावर अलीकडच्या काळात तयार झालेली घळ सापडली आहे. गेल्या तीन वर्षांत मार्गिकेसारखा हा आकार तयार झाला असावा, असे वैज्ञानिकांनी सांगितले.

First published on: 25-03-2014 at 01:05 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nasa recent research on mars