गुजरात विधानसभा निवडणुकीत गुरुवारीच विजयी झालेल्या काँग्रेस आमदार सविताबेन खांट यांचे शनिवारी मेंदूतील रक्तस्त्रावाने निधन झाले. त्या ५२ वर्षांच्या होत्या. पंचमहल जिल्ह्य़ातील मोरवा हदाफ विधानसभा मतदारसंघातून त्या विजयी झाल्या होत्या.
मतमोजणी सुरू असताना सविताबेन केंद्रावर होत्या. तेथेच त्यांना अस्वस्थ वाटू लागले आणि त्या खुर्चीतून खाली कोसळताच त्यांना तातडीने जिल्हा मुख्यालय असलेल्या गोध्रा येथील रुग्णालयात नेण्यात आले. तेथेही त्यांची प्रकृती अधिकच ढासळू लागताच त्यांना गोध्राहून १०० किलोमीटरवर असलेल्या खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. कृत्रिम श्वसनयंत्रणेद्वारे त्यांचा श्वासोच्छवास सुरू होता मात्र शुक्रवारी दुपारी त्यांचा मृत्यू ओढवला.
मतदारसंघ फेररचनेनंतर नव्याने तयार झालेल्या मोरवा हदाफ मतदारसंघातून सविताबेन यांनी भाजपचे बिजलीभाई दामोर यांचा ११ हजार २८९ मतांनी पराभव केला होता. दुर्दैवाचा भाग असा की या निवडणुकीत आपण विजयी झालो आहोत, हे कळायला त्या शुद्धीवरच नव्हत्या. अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव गोध्रा येथे ठेवण्यात येणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Dec 2012 रोजी प्रकाशित
काँग्रेसच्या विजयी उमेदवाराचे निधन
गुजरात विधानसभा निवडणुकीत गुरुवारीच विजयी झालेल्या काँग्रेस आमदार सविताबेन खांट यांचे शनिवारी मेंदूतील रक्तस्त्रावाने निधन झाले. त्या ५२ वर्षांच्या होत्या. पंचमहल जिल्ह्य़ातील मोरवा हदाफ विधानसभा मतदारसंघातून त्या विजयी झाल्या होत्या.
First published on: 22-12-2012 at 01:51 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Newly elected gujarat congress mla passes away