बिहार विधानसभेच्या निवडणुकीत जद(यू)ला जोरदार प्रसिद्धी द्यावी अन्यथा वृत्तपत्रांना देण्यात येणाऱ्या जाहिराती थांबविण्यात येतील, अशी धमकी मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे निकटचे सहकारी प्रशांत किशोर आणि ज्येष्ठ मंत्री विजयकुमार चौधरी यांनी माध्यमांना दिली असल्याचा आरोप भाजपने केला आहे.
माध्यमांमध्ये होत असलेली टीका नितीशकुमार यांच्या पचनी पडत नसल्यानेच किशोर आणि चौधरी या त्यांच्या सहकाऱ्यांनी ब्लॅकमेल करण्याचे प्रकार सुरू केले आहेत, असे भाजपचे नेते सुशील मोदी म्हणाले.
या प्रश्नावर भाजप मोठय़ा प्रमाणावर निदर्शने करणार असून दिल्लीत प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाच्या कार्यालयासमोर धरणे धरण्याचा विचार सुरू आहे, माध्यमांनी या धमक्यांना भीक घालू नये, असे आवाहनही मोदी यांनी केले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 12th Aug 2015 रोजी प्रकाशित
नितीशकुमार यांच्या सहकाऱ्यांकडून माध्यमांचे ‘ब्लॅकमेल’
बिहार विधानसभेच्या निवडणुकीत जद(यू)ला जोरदार प्रसिद्धी द्यावी अन्यथा वृत्तपत्रांना देण्यात येणाऱ्या जाहिराती थांबविण्यात येतील,
First published on: 12-08-2015 at 12:38 IST
TOPICSसुशील मोदी
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nitish aide senior minister blackmailing media says sushil modi