जगभरातील काही देशात गांज्याच्या विक्रीबाबत कठोर कायदे करण्यात आले आहेत. अमेरिकेतही गांजाचा वापर केल्यास थेट कारागृहात रवानगी केली जात होती. मात्र, आता अमेरिका सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. गांजाचा वापर करताना दोषी ठरवण्यात आलेल्या हजारो नागरिकांना निर्दोष ठरवण्यात आलं आहे. त्यांची लवकरच कारागृहातून सुटका करण्यात येणार आहे, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी गुरुवारी सांगितलं.

राष्ट्राध्यक्ष जो बायडेन म्हणाले, “गांजाची विक्री आणि त्याचा वापर केल्याबद्दल दोषी ठरवण्यात आलेले नागरिक कारागृहात आहेत. त्यांना माफी देण्यात आली आहे. यापुढे कोणालाही गांजा जवळ ठेवल्यास अथवा वापर केल्यास, त्याची रवानगी कारागृहात होणार नाही. मात्र, लहान मुलांनी गांज्याची तस्करी आणि विक्री करण्यावर मर्यादा कायम ठेवण्यात आल्या आहेत,” असेही जो बायडेन यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा – धक्का लागला म्हणून अल्पवयीन मुलीला शाळेच्या शौचालयात नेत विद्यार्थ्यांचा सामूहिक बलात्कार, राजधानी पुन्हा एकदा हादरली

दरम्यान, अमेरिकेत गांज्याबाबात १९७० कायदा तयार करण्यात आला होता. त्यानुसार हजारो नागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १९९२ ते २०२१ पर्यंत ६,५०० लोकांवर कारवाई करत, त्यांना दोषी ठरवलं होते. ज्यांना आता जो बायडेन यांनी माफी दिली आहे. त्यांची लवकरच कारागृहातून सुटका होणार आहे.