घरगुती वापराच्या विनाअनुदानित सिलिंडरच्या किंमतीत सोमवारी तीन रुपयांनी कपात करण्यात आली. आंतरराष्ट्रीय बाजारात वायू दरात घट झाल्याने सिलिंडरच्या किंमतीत कपात करण्यात आलीये. पेट्रोलच्या दरातही प्रतिलिटर ८५ पैशांनी कपात करण्यात आलीये. सोमवारी मध्यरात्रीनंतर नवे दर लागू होतील.
केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार प्रत्येक कुटूंबाला दर वर्षाला ९ अनुदानित सिलिंडर देण्यात येतील. त्यानंतरचे सिलिंडर ग्राहकाला बाजारभावाप्रमाणे विकत घ्यावे लागतील. याच सिलिंडरच्या किंमतीत कपात करण्यात आलीये. इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने दिलेल्या माहितीनुसार दिल्लीमध्ये विनाअनुदानित सिलिंडरची किंमत ९०१.५० रुपये राहणार आहे.