गेल्या काही दिवसांपासून ओडिशामध्ये चर्चेत असणारे आयएएस अधिकारी व्ही. के. पांडियन यांची स्वेच्छानिवृत्ती केंद्र सरकारने मान्य केली आहे. त्यामुळे २००० सालच्या बॅचचे आयएएस अधिकारी पांडियन मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव म्हणून निवृत्त होत आहेत. मात्र, ही फक्त एका प्रशासकीय अधिकाऱ्याची निवृत्ती नसून त्यामागे ओडिशातील राजकीय घडामोडींचे संदर्भ असल्याचं सांगितलं जात आहे. व्ही. के. पांडियन अत्यंत अल्पकाळात मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्या अंतर्गत वर्तुळात दाखल झाले होते. त्यामुळे आता निवृत्तीनंतर ते थेट राजकारणात प्रवेश करून मुख्यमंत्र्यांच्या बीजेडी पक्षात प्रवेश करण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.

कोण आहेत व्ही. के. पांडियन?

व्ही. के. पांडियन हे ओडिशातील सर्वात प्रभावशाली प्रशासकीय अधिकारी मानले जातात. २००० सालच्या आयएएस बॅचचे पांडियन हे मूळचे तमिळनाडूचे आहेत. मयूरभंज व गंजम अशा ओडिशातील मोठ्या जिल्ह्यांपासून त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. गंजम हा मुख्यमंत्र्यांचा जिल्हा आहे. तिथे त्यांच्या कामगिरीने त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधून घेतलं. कारकिर्दीच्या ११व्या वर्षी ते थेट मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव म्हणून रुजू झाले. एकीकडे त्यांचे सहकारी अधिकारी केंद्रात प्रतिनियुक्तीवर जात असताना दुसरीकडे स्वत: पांडियन मात्र ओडिशातच मुख्यमंत्री कार्यालयात कार्यरत होते. त्यांच्या पत्नी सुजाता कार्तिकेयन याही आयएएस अधिकारीच असून ओडिशातील मिशन शक्ती विभागाच्या आयुक्त आहेत.

ashok gehlot son vaibhav loksabha election
भाजपाने पेपर फुटी प्रकरणाचा मुद्दा तापवला, अशोक गहलोतांच्या कार्यकाळातील मुद्द्यामुळे सुपुत्र अडचणीत?
homes, mill workers, mmrda
संथ कारभाराचा गिरणी कामगारांना फटका, रांजनोळीतील १२४४ घरांची दुरुस्ती रखडलेली; २५२१ घरांची सोडतही लांबणीवर
Prime Minister Modi criticism of Rahul gandhi Lalu Prasad Yadav regarding meat
श्रावण महिन्यात मटणावर ताव; पंतप्रधान मोदी यांची राहुल-लालूप्रसाद यांच्यावर टीका
Loksatta Lokrang Economist Sanjeev Sanyal Neon Show In this podcast UPSC Exam
विद्यार्थ्यांचा ओढा का?

“मुंगेरी लाल के हसीन सपने”, भावी पंतप्रधान उल्लेख केल्यामुळे अखिलेश यादवांवर भाजपाची टीका

व्ही. के. पांडियन यांची प्रशासनावरील पकड आणि प्रभाव विशेष चर्चेचा ठरला आहे. त्यांनी राबवलेले अनेक उपक्रम आज ओडिशातील प्रत्येक विभागात राबवले जातात. त्यांनी केलेल्या प्रशासकीय सुधारणा, पुरीच्या विकासासाठीचा ३२०० कोटींचा प्रकल्प, कटक वैद्यकीय महाविद्यालयाचा पुनर्विकास अशा अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांवर पांडियन यांनी आपली छाप सोडली आहे.

पांडियन यांच्यावर टीका

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पांडियन विरोधकांच्या टीकेच्या केंद्रस्थानी राहिले आहेत. नुकताच त्यांनी ओडिशातील सर्व जिल्ह्यांचा शासकीय हेलिकॉप्टरमधून दौरा केला. त्यामुळे सरकारी खर्चावर हेलिकॉप्टरवारी करत जनतेचा पैसा वाया घालवल्याचा आरोप त्यांच्यावर विरोधकांनी केला.

राजकीय प्रवेश?

दरम्यान, अल्पकाळात मुख्यमंत्र्यांच्या अंतर्गत वर्तुळात प्रवेश करण्याची संधी व्ही. के. पांडियन यांना मिळाली. या काळात त्यांनी मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांचा विश्वास संपादन केला आहे. अचानक स्वेच्छानिवृत्तीचा निर्णय त्यांनी जाहीर केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. निवृत्तीनंतर पटनाईक राजकारणात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.