जीनिव्हा : युद्धामुळे युक्रेनमधून बाहेर पडलेल्या लोकांची संख्या १७ लाखांहून अधिक झाली असल्याचे संयुक्त राष्ट्रांच्या निर्वासितविषयक संस्थेने म्हटले आहे.२४ फेब्रुवारीला रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यापासून इतर देशांमध्ये आश्रय घेतलेल्या लोकांची संख्या सुमारे १७ लाख ३५ हजार असल्याचे संयुक्त राष्ट्रांच्या निर्वासितविषयक उच्चायुक्तांनी (यूएनएचसीआर) सोमवारी सांगितले. रविवारी हीच संख्या १५ लाख ३० हजार होती.

बाहेर पडलेल्या लोकांपैकी जवळपास तीन पंचमांश, म्हणजे सुमारे १० लाख ३० हजार लोक पोलंडमध्ये, १ लाख ८० हजार लोक हंगेरीमध्ये, तर १ लाख २८ हजार लोक स्लोव्हाकियात गेले आहेत.

China's eyes on donkeys in Africa, why is China's hunger for the continent of Africa a headache?
चीनची भूक आफ्रिकन महिलांसाठी का ठरतेय डोकेदुखी?
due to events of previous years causes global warming
गतवर्षांतील घटनांमुळे जागतिक तापमानवाढीला दुजोरा; ‘अ‍ॅडव्हान्सेस इन अ‍ॅटमॉस्फेरिक सायन्स’च्या अभ्यास अहवालाचा निष्कर्ष
Botswana threatening Germany to send elephants
२० हजार हत्तींचं जर्मन कनेक्शन काय? जाणून घ्या
ILO report
विश्लेषण : देशातील बेरोजगारांमध्ये ८३ टक्के तरुण! ILO च्या अहवालामध्ये आणखी कोणता धक्कादायक तपशील?

दरम्यान, युक्रेनसह शेजारच्या पोलंड व रुमानियामधून येणाऱ्या निर्वासितांचे स्वागत करण्यासाठी युरोपीय महासंघाच्या सर्व २७ सदस्य राष्ट्रांनी ‘सर्व संसाधानांचा’ वापर करावा, असे आवाहन महासंघाचे परराष्ट्र व्यवहार धोरण प्रमुख जोसेप बोरेल यांनी फ्रान्समधील मोंटपेलियरमध्ये केले.