पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील हजरत साखी सरवर या सुफी दग्र्यात एप्रिल २०१० मध्ये हल्ला चढवून ५२ भाविकांचा बळी घेणाऱ्या बेहराम खान याला गुरुवारी दहशतवादविरोधी न्यायालयाने ५२ वेळा मृत्युदंड सुनावला आहे तर या हल्ल्यात आत्मघाती स्फोट घडविण्याआधीच पकडल्या गेलेल्या ओमर फिदाइ याला ५२ वेळा जन्मठेपेची सजा सुनावली आहे. विशेष म्हणजे हा खटला सुरू असतानाच न्या. आसिफ मजिद यांची हत्या करण्याची धमकी तालिबानी संघटनेने गेले २२ महिने वारंवार देऊनही तिला भीक न घालता न्या. मजिद यांनी हा निकाल दिला आहे.
बेहराम खान ऊर्फ सुफी बाबा याने ३ एप्रिल २०१० रोजी हा हल्ला आणि स्फोट घडविले. त्यात ५२ लोक ठार तर १५० हून अधिक लोक जखमी झाले. बेहराम खानला बाजौर आदिवासी प्रांतातील चकमकीत सुरक्षा दलाने एप्रिल २०११ मध्ये अटक केली होती. दग्र्यातील हल्ल्यात ओमर फिदाइ हा गंभीर जखमी झाला होता. त्याच्या साथीदारांनी त्याच्या अंगाला बांधण्यासाठी आणलेल्या स्फोटकांचे कडय़ाचा नंतर स्फोट घडवला होता. जखमी अवस्थेत फिदाइला अटक झाली होती. तो तेव्हा अवघा १४ वर्षांचा होता.
५२ लोकांचा बळी घेतल्याबद्दल बेहरामला ५२ वेळा मृत्युदंड ठोठावण्यात आला तर या हल्ल्यात महत्त्वाचा भाग घेतल्याबद्दल फिदाइला ५२ जन्मठेपांची सजा सुनावली गेली. या हल्ल्यातील अन्य चार आरोपींची पुराव्याअभावी सुटका करण्यात आली.
तालिबान्यांनी सुमारे ३५० मुलांना आत्मघातकी अतिरेक्याचे प्रशिक्षण दिल्याची माहिती फिदाइने चौकशीत उघड केली होती. फिदाइ आणि खान हे दोघे सध्या डेरा गाझी खान येथील मध्यवर्ती तुरुंगात असून तेथे कमालीचा बंदोबस्त आहे.
या खटल्यातील पहिल्या तिन्ही सुनावण्या डेरा गाझी खान येथील दहशतवादविरोधी न्यायालयात झाल्या. मात्र तालिबान्यांच्या धमक्यांचे प्रमाण वाढू लागल्यानंतर चौथी व अंतिम सुनावणी डेरा गाझी खान मध्यवर्ती तुरुंगात झाली.
संग्रहित लेख, दिनांक 8th Mar 2013 रोजी प्रकाशित
पाकमधील सुफी दग्र्यात स्फोट घडविणाऱ्यास ५२ वेळा मृत्युदंड
पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील हजरत साखी सरवर या सुफी दग्र्यात एप्रिल २०१० मध्ये हल्ला चढवून ५२ भाविकांचा बळी घेणाऱ्या बेहराम खान याला गुरुवारी दहशतवादविरोधी न्यायालयाने ५२ वेळा मृत्युदंड सुनावला आहे तर या हल्ल्यात आत्मघाती स्फोट घडविण्याआधीच पकडल्या गेलेल्या ओमर फिदाइ याला ५२ वेळा जन्मठेपेची सजा सुनावली आहे.

First published on: 08-03-2013 at 01:29 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pak court sentences sufi shrine bombing mastermind to death