आत्मघातकी हल्ल्यात तालिबानविरोधी पाकिस्तानी नेते बशीर अहमद बिनोर याच्या हत्येबद्दल पाकिस्तानी जनतेकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आह़े पाकिस्तानी राजकीय नेत्यांनी आणि प्रसारमाध्यमांनीही याला ‘नागवा दहशतवाद’ असे संबोधले आह़े विशेष म्हणजे ‘या अतिरेक्यांकडे अफगाणिस्तान आणि भारताविरोधातील परराष्ट्र धोरणातील उपयोगी गोष्ट’ या दृष्टीने पाहणे बंद करावे,’ असेही नेत्यांनी लष्कराला बजावले आह़े
सत्ताधारी पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या नेत्यांनी आणि पंतप्रधान राजा परवेझ आश्रफ यांनीही या घटनेबाबत दु:ख व्यक्त करीत देशभर एक दिवसाच्या दुखवटय़ाची घोषणा केली आह़े बंदी घालण्यात आलेल्या ताहरीक- ए- तालिबान पाकिस्तान या संघटनेने हल्ल्याची जबाबदारी घेतली आह़े
अनेक अतिरेक्यांना प्रशिक्षण देणाऱ्या एका तालिबानी नेत्याच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी हा हल्ला केल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले आह़े बिनोर यांच्यावरील आत्मघातकी हल्ल्यात आणखी ८ जण मृत्युमुखी पडले आणि २० जण जखमी झाल़े
संग्रहित लेख, दिनांक 24th Dec 2012 रोजी प्रकाशित
बिनोर यांच्या हत्येचा पाकिस्तानात निषेध
आत्मघातकी हल्ल्यात तालिबानविरोधी पाकिस्तानी नेते बशीर अहमद बिनोर याच्या हत्येबद्दल पाकिस्तानी जनतेकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आह़े पाकिस्तानी राजकीय नेत्यांनी आणि प्रसारमाध्यमांनीही याला ‘नागवा दहशतवाद’ असे संबोधले आह़े
First published on: 24-12-2012 at 01:07 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pak politicians media condemn bilours killing