पाकिस्तानी सरकार जर तेथील रेल्वेसमोरच्या अडचणी सोडवू शकत नसेल तर पाकिस्तानचे रेल्वे खाते भारताचे माजी रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांना चालवायला द्या, अशा शब्दांत मुत्तहिद कौमी चळवळीचे खासदार साजिद अहमद यांनी पाकिस्तानी रेल्वेमंत्र्यांवर टीका केली.
पाकिस्तानच्या रेल्वे खात्याचे प्रगतीपुस्तक पाक संसदेच्या कनिष्ठ सभागृहात नुकतेच सादर करण्यात आले. रेल्वे खात्याचे संसदीय सचिव नोमान इस्लाम शेख हे त्या अनुषंगाने विचारल्या जाणाऱ्या शंकांना उत्तरे देत होते. या वेळी अहमद यांनी सरकारला हा घरचा आहेर दिला.
भारतीय रेल्वेचा चेहरामोहरा बदलणारे म्हणून लालूप्रसाद यादव प्रसिद्ध आहेत.
पाकिस्तानचे रेल्वे खाते गेली काही वर्षे सातत्याने आर्थिक अडचणींमुळे अनेक गाडय़ा रद्द होणे, देखभालीदरम्यान सुटे भाग उपलब्ध नसणे, डब्यांची अनुपलब्धता आणि इंधनाचा अभाव अशा अनेक संकटांचा सामना करीत आहे.
रेल्वेला नफा मिळवून द्यायचा असेल तर नव्या डब्यांची खरेदी, नव्या गाडय़ांची निर्मिती गरजेची आहे, असे सांगत शेख यांनी पाकिस्तानी रेल्वेसमोरील अडचणींचा पाढा वाचण्यास सुरुवात केली. त्यावर संतापलेल्या साजिद अहमद यांनी तुम्हाला सांभाळता येत नसेल तर रेल्वे खाते लालूंकडे द्या, असा टोमणा मारला.
संग्रहित लेख, दिनांक 17th Nov 2012 रोजी प्रकाशित
पाकिस्तानी रेल्वेमंत्र्यांना संसदेच्या कानपिचक्या
पाकिस्तानी सरकार जर तेथील रेल्वेसमोरच्या अडचणी सोडवू शकत नसेल तर पाकिस्तानचे रेल्वे खाते भारताचे माजी रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांना चालवायला द्या, अशा शब्दांत मुत्तहिद कौमी चळवळीचे खासदार साजिद अहमद यांनी पाकिस्तानी रेल्वेमंत्र्यांवर टीका केली.
First published on: 17-11-2012 at 05:19 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pak railway minister saying that to give railway department to lalu prasad yadav