येथील महिला डॉक्टरनी पतीशी झालेल्या भांडणाचा राग आपल्या दोन महिन्यांच्या मुलावर  काढला. तिने त्यास चक्क छतावरुन फेकले. मेहनविश नूर असे या डॉक्टरचे नाव आहे, तिने आपल्या दोन महिन्यांच्या मुलाला सोमवारी गच्चीवरून फेकून दिले, त्यात चिमुकल्याचा मृत्यू झाला, असा दावा तिचा पती अली रझा यांनी केला आहे.  रझा हेदेखील डॉक्टर आहेत. आपल्या पत्नीची मानसिक स्थिती बिघडली असल्याची  माहिती त्याने पोलिसांनी दिली. रझा यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी नूरला अटक केली असून तिच्यावर हत्या करण्याचा आरोप ठेवला आहे. रझा व नूर यांचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. नूर यांनी रविवारी पोलिस हेल्पलाइनला दूरध्वनी करून आपला पती आपल्याला सोडून ब्रिटनला जात असल्याची तक्रार केली होती. पतीच्या अनुपस्थितीमध्ये सासरची मंडळी आपल्याला ठार मारतील, असा दावा नूर यांनी या तक्रार केला होता. लाहोर पोलीस या तक्रारीचीही चौकशी करीत आहेत.