दक्षिण दिल्लीत सोमवारी रात्री भारतातील पाकिस्तानचे अधिकारी आपल्या चालकासह कारमधून घरी जात असताना त्यांना अपघातानंतर झालेल्या मारहाणप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानचे व्यापार विषयक सर्वोच्च सचिव सय्यद झिरगम रझा, आपल्या निवासस्थानी वसंत विहारमध्ये परत येत असताना त्यांच्या गाडीला दुचाकीने धडक दिली. त्यावेळी दुचाकीस्वार आणि त्यांच्यात वाद झाला. यातून पाकिस्तानच्या अधिकाऱ्याला किरकोळ मारहाण करण्यात आली. याप्रकरणी एक महिला आणि तिच्या पुतण्याला अटक करण्यात आली आहे.
अटक करण्यात आलेली महिला रोशनी आणि तिचा पुतण्या रोहीतवर अपघात आणि त्यानंतर केलेल्या मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 4th Jun 2013 रोजी प्रकाशित
पाक अधिकाऱ्याला मारहाणप्रकरणी दोघांना अटक
दक्षिण दिल्लीत सोमवारी रात्री भारतातील पाकिस्तानचे अधिकारी आपल्या चालकासह कारमधून घरी जात असताना त्यांना अपघातानंतर झालेल्या मारहाणप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
First published on: 04-06-2013 at 02:10 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pakistani diplomat assaulted in delhi road rage case 2 arrestedv