गुरूवारी स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केलं. प्रत्येक घरात पिण्याचं स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे. तसेच पाण्याच्या बचतीसाठी सरकार प्रयत्न करणार असून ‘जल जीवन मिशन’वर सरकार काम करणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. तसेच यासाठी 3.5 लाख कोटी खर्च करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

प्रत्येक घरात पिण्याचं स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे. पाणी वाचवण्यासाठी सरकार प्रयत्न करणार आहे. जलसिंचन, जल संचय वाढवण्यावर केंद्र सरकार भर देणार आहे. केंद्र आणि राज्य सरकार मिळून जल जीवन मिशनवर केंद्र आणि राज्य सरकार मिळून 3.5 लाख कोटी रूपये खर्च करणार असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. या अभियानासाठी केंद्र आणि राज्य सरकार एकत्र काम करणार आहे.

वाहते पाणी थांबवण्यासाठी, तसेच मायक्रो एरिगेशन, पाणी वाचवण्यासाठी सामान्य नागरिकांमध्ये जागरूकता वाढवण्याची आवश्यकता आहे. तसेच शाळकरी मुलांना पाण्याचं महत्त्व समजण्यासाठी शिक्षण देण्यात येणार आहे. दरम्यान, गेल्या 70 वर्षांमध्ये जे काम झाले नाही ते पुढील पाच वर्षांमध्ये पाच पट वेगाने करण्यासाठी प्रयत्न करावे, असे ते म्हणाले. भविष्य काळात एक असा दिवस येईल जेव्हा किराणामालाच्या दुकानातही पिण्याचे पाणी विकत मिळेल, असे 100 वर्षांपूर्वी जैन मुनी महुडी यांनी सांगितलं होतं. त्यांनी सांगितलेली गोष्ट आज खरी ठरत असल्याचेही ते म्हणाले.