PM Narendra Modi Speech : गेल्या चार महिन्यांपासून मणिपूरमध्ये अंतर्गत असंतोष व हिंसाचाराच्या अनेक घटना घडताना दिसत आहेत. यावर पंतप्रधान मोदींनी अद्याप संसदेत भूमिका न मांडल्यामुळे विरोधकांनी त्यांच्याविरोधात अविश्वासाचा ठराव आणला आहे. यानंतर विरोधी पक्षांकडून करण्यात आलेल्या भाषणांमध्ये मोदींवर अनेक आरोप व टीका-टिप्पणी झाल्यानंतर पंतप्रधानांच्या भाषणाकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं होतं.

अखेर आज हे पंतप्रधानांच्या उत्तराचा संसदेच्या कामकाज पत्रिकेत समावेश करण्यात आला.

Live Updates

PM Modi No Confidence Motion : अविश्वास प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं संसदेत भाषण...

19:31 (IST) 10 Aug 2023
PM Narendra Modi Speech: मोदींच्या भाषणावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया...

मोदींच्या भाषणावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया...

https://twitter.com/ANI/status/1689637522949992449

19:26 (IST) 10 Aug 2023
PM Narendra Modi Speech Live: पंतप्रधान मोदी अविश्वास प्रस्ताव लाइव्ह

आवाजी मतदानाच्या माध्यमातून मोदी सरकारविरोधातील अविश्वास ठराव फेटाळण्यात आला...

https://twitter.com/ANI/status/1689636143997059072

19:25 (IST) 10 Aug 2023
PM Narendra Modi Speech Live: पंतप्रधान मोदी अविश्वास प्रस्ताव भाषण लाइव्ह

या देशात मणिपूरपेक्षा गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. पण आपण एकत्र मिळून त्या समस्यांमधून मार्ग काढला आहे. त्यामुळे आपण एकत्र मिळून चालूयात आणि मणिपूरच्या लोकांना विश्वास देऊयात. राजकारणाचा खेळ करण्यासाठी मणिपूरच्या भूमिचा वापर करू नका. सत्ताधारी बाकांवरून या मुद्द्यावर समृद्ध चर्चा झाली - मोदी

19:13 (IST) 10 Aug 2023
PM Narendra Modi Speech Live: पंतप्रधान मोदी अविश्वास प्रस्ताव भाषण लाइव्ह

मी विरोधकांचं एका गोष्टीसाठी कौतुक करेन, की २०१८ मध्ये मी त्यांना सांगितलं होतं की २०२३मध्ये अविश्वास ठराव आणा. माझं त्यांनी ऐकलं आणि अविश्वास ठराव आणला. पण तयारी केली नाही. देशाला त्यांनी काही निराश केलं. हरकत नाही, २०२८ मध्ये पुन्हा ते अविश्वास प्रस्ताव आणतील. पण अपेक्षा आहे की २०२८मध्ये तयारीनिशी अविश्वास ठराव आणतील. जनतेला किमान इतका तरी विश्वास वाटावा की हे किमान विरोधी पक्षाच्या लायकीचे तरी आहेत. आरडा-ओरडा करण्यासाठी त्यांना १०-१५ लोक मिळतीलही. पण थोडं डोक्याचंही काम त्यांनी करावं - मोदी

https://twitter.com/ANI/status/1689635439429431297

19:10 (IST) 10 Aug 2023
PM Narendra Modi Speech Live: पंतप्रधान मोदी अविश्वास प्रस्ताव भाषण लाइव्ह

शरीराचा कण कण, वेळेचा प्रत्येक क्षण फक्त देशवासीयांसाठी देईन - मोदी

19:08 (IST) 10 Aug 2023
PM Narendra Modi Speech Live: पंतप्रधान मोदी अविश्वास प्रस्ताव भाषण लाइव्ह

आमच्या सरकारने नॉर्थ-इस्टच्या विकासाला प्राधान्य दिलं आहे - मोदी

19:02 (IST) 10 Aug 2023
PM Narendra Modi Speech Live: पंतप्रधान मोदी अविश्वास प्रस्ताव भाषण लाइव्ह

आज मणिपूरच्या समस्यांना असं दाखवलं जातंय की जणूकाही गेल्या काही दिवसांमध्येच या समस्या निर्माण झाल्या आहेत. तिथल्या समस्यांची कुणी जननी असेल, तर ती काँग्रेस आहे. त्यांचं राजकारण यासाठी जबाबदार आहे - मोदी

https://twitter.com/ANI/status/1689634213992275969

19:00 (IST) 10 Aug 2023
PM Narendra Modi Speech Live: पंतप्रधान मोदी अविश्वास प्रस्ताव भाषण लाइव्ह

तीन प्रसंग..

पहिली घटना.. ५ मार्च १९६६.. या दिवशी काँग्रेसनं मिझोराममध्ये असहाय नागरिकांवर वायूसेनेच्या माध्यमातून हल्ला केला होता. तेव्हा मोठा वाद झाला होता. काँग्रेसवाल्यांनी सांगावं की ती दुसऱ्या देशाची वायूसेना होती का? मिझोराममधले नागरिक दुसऱ्या देशाचे होते का? आजही मिझोराममध्ये ५ मार्चला शोक व्यक्त केला जातो. काँग्रेसनं हे सत्य देशापासून लपवून ठेवलं आहे. आपल्याच देशात वायुसेनेच्या माध्यमातून हल्ला करवला.

दुसरा प्रसंग...

१९६२ चं ते रेडिओ प्रक्षेपण अजूनही त्रिशूळाप्रमाणे लोकांना टोचतंय. नेहरूंनी १९६२ साली देशावर चीनचा हल्ला झाला होता, रेडिओवर सांगितलं की माझं मन आसामच्या लोकांसाठी पिळवटून निघतंय. ते प्रक्षेपण आजही आसामच्या लोकांना टोचणी देतंय.

जे लोक स्वत:ला लोहियांचा वारस समजतात, काल सभागृहात उठून बोलत होते, लोहियांनी नेहरूंवर गंभीर आरोप केला होता. लोहियांनी सांगितलं होतं की जाणून बुजून नेहरू पूर्वेकडच्या राज्यांचा विकास करत नाहीत. ये कितनी लापरवाहीवाली और कितनी खतरनाक बात है, तीस हजार स्क्वेअर मीलसे ज्यादा क्षेत्रको हर तरहके विकास से वंचित कर दिया गया है. लोहियाजी असं म्हणाले होते.

https://twitter.com/ANI/status/1689632505086013441

18:52 (IST) 10 Aug 2023
PM Narendra Modi Speech Live: पंतप्रधान मोदी अविश्वास प्रस्ताव भाषण लाइव्ह

कच्छुतिवु काय आहे? तमिळानाडूच्या पुढे एक बेट कुणी कुठल्या देशाला देऊन टाकलं होतं. काय झालं होतं तेव्हा? तेही तुम्ही तोडलं. कोण होतं तेव्हा? इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली हे झालं होतं. काँग्रेसचा इतिहास भारत मातेला छिन्नविच्छिन्न करण्याचा राहिला आहे - मोदी

https://twitter.com/ANI/status/1689631070013345792

18:48 (IST) 10 Aug 2023
PM Narendra Modi Speech Live: पंतप्रधान मोदी अविश्वास प्रस्ताव भाषण लाइव्ह

सभागृहात भारत मातेविषयी जे बोललं गेलं, त्यामुळे भारतीयांचं मन दुखावलं आहे. मला माहिती नाही, पण सत्तेशिवाय कुणाची अशी स्थिती होते? सत्तशिवाय जगू शकत नाहीत. काय भाषा वापरत आहेत हे. काही लोक भारत मातेच्या मृत्यूची इच्छा व्यक्त कर आहेत. यापेक्षा मोठं दुर्दैव काय असेल. हे लोक कधी लोकशाहीच्या हत्येबाबत बोलतात, कधी संविधानाच्या हत्येबाबत बोलतात. जे यांच्या मनात आहे, तेच त्यांच्या कृतीतून समोर येत आहे - मोदी

18:47 (IST) 10 Aug 2023
PM Narendra Modi Speech Live: पंतप्रधान मोदी अविश्वास प्रस्ताव भाषण लाइव्ह

मी मणिपूरच्या लोकांना, तिथल्या माता-भगिनींना सांगू इच्छितो की देश तुमच्यासोबत आहे. हे सभागृह तुमच्यासोबत आहे. आपण सगळे मिळून या संकटावर तोडगा काढू. तिथे पुन्हा शांतता प्रस्थापित होईल. मणिपूर पुन्हा विकासाच्या दिशेने वेगाने वाटचाल करेल. त्यासाठीच्या प्रयत्नांमध्ये कोणतीही कमतरता राहणार नाही - मोदी

18:45 (IST) 10 Aug 2023
PM Narendra Modi Speech Live: पंतप्रधान मोदी अविश्वास प्रस्ताव भाषण लाइव्ह

मणिपूरमध्ये कोर्टाचा एक निर्णय आला. तिथे काय होतंय हे आपल्याला माहिती आहे. तिथे जी परिस्थिती निर्माण झाली, हिंसाचार उसळला, त्यात अनेक कुटुंबांना त्रास झाला. अनेकांनी आप्तस्वकीय गमावले. महिलांबाबत गंभीर अपराध झाले. हे अपराध अक्षम्य आहेत. दोषींना कठोर शिक्षा देण्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार मिळून प्रयत्न करत आहे. देशाच्या सर्व नागरिकांना मी आश्वस्त करू इच्छितो की नजीकच्या भविष्यात शांततेचा सूर्य नक्कीच उगवेल. मणिपूर पुन्हा एकदा नव्या आत्मविश्वासानिशी पुढे जाईल - मोदी

https://twitter.com/ANI/status/1689628179684888576

18:44 (IST) 10 Aug 2023
PM Narendra Modi Speech Live: पंतप्रधान मोदी अविश्वास प्रस्ताव भाषण लाइव्ह

मणिपूरच्या स्थितीवर अमित शाहांनी बुधवारी दोन तास सविस्तर माहिती दिली. सरकारची चिंता व्यक्त केली. त्यातून जनतेला जागृत करण्याचाही प्रयत्नही होता. मणिपूरपर्यंत एक संदेश पोहोचवण्याचाही प्रयत्न होता. मणिपूरच्या समस्येवर मार्ग शोधण्याचा तो प्रयत्न होता. पण राजकारणाशिवाय काही करायचयं नाही म्हणून विरोधकांनी हे सगळं केलं - मोदी

18:43 (IST) 10 Aug 2023
PM Narendra Modi Speech Live: पंतप्रधान मोदी अविश्वास प्रस्ताव भाषण लाइव्ह

आम्ही म्हटलं होतं की फक्त मणिपूरवर चर्चा करू. पण त्यांच्यात साहस नव्हतं, इच्छा नव्हती, पोटात पाप होतं. दुखत पोटात होतं आणि फोडत होते डोकं - मोदी

18:42 (IST) 10 Aug 2023
PM Narendra Modi Speech Live: पंतप्रधान मोदी अविश्वास प्रस्ताव भाषण लाइव्ह

अमित शाहांनी मणिपूरबाबत सविस्तर माहिती दिल्यानंतर या लोकांनी काय काय खोटं पसरवलं होतं, ते सगळ्यांना समजलं - मोदी

18:41 (IST) 10 Aug 2023
PM Narendra Modi Speech Live: पंतप्रधान मोदी अविश्वास प्रस्ताव भाषण लाइव्ह

मणिपूरवर बोलण्याची मागणी करत विरोधकांनी मोदींचं भाषण चालू असतानाच सभात्याग केला...

https://twitter.com/ANI/status/1689626486922498048

18:40 (IST) 10 Aug 2023
PM Narendra Modi Speech Live: पंतप्रधान मोदी अविश्वास प्रस्ताव भाषण लाइव्ह

तिसऱ्या टर्ममध्ये मी देशाला टॉप तीनमध्ये आणून दाखवेन ही माझी देशाला गॅरंटी आहे - मोदी

18:33 (IST) 10 Aug 2023
PM Narendra Modi Speech Live: पंतप्रधान मोदी अविश्वास प्रस्ताव भाषण लाइव्ह

काँग्रेस कित्येक वर्षांपासून एकच उत्पादन लाँच करतात, पण प्रत्येक वेळी लाँचिंग अपयशी होतं. मग हे जनतेवर राग काढतात. पण पीआरची लोकं मोहोब्बत की दुकान चा प्रचार करते. त्यामुळे जनता म्हणते ये है लूट की दुकान, झूठ का बाजार, इसमें नफरत है, घोटाले है, तुष्टीकरण है, मन काले है, परिवारवाद की आग के दशकों से देश हवाले है.. तुम्हारी दुकान ने इमर्जन्सी बेची है, बटवारा बेचा है, सीखों पर अत्याचार बेचा है, झूठ कितना सारा बेचा है, इतिहास बेचा है, पुरी के सच का प्रमाण बेचा है, शर्म करो नफरत की दुकान वालों, तुमने सेना का इमान बेचा है - मोदी

https://twitter.com/ANI/status/1689628153042669568

18:30 (IST) 10 Aug 2023
PM Narendra Modi Speech Live: पंतप्रधान मोदी अविश्वास प्रस्ताव भाषण लाइव्ह

काल इथे मनापासून बोलण्याबाबत बोललं गेलं. त्यांच्या डोक्याची स्थिती तर देशाला बऱ्याच काळापासून माहिती आहे. आता त्याच्या हृदयाबाबतही समजलं. यांचं मोदीप्रेम एवढं आहे की २४ तास त्यांना स्वप्नात मोदी दिसतात. मोदी भाषण चालू असताना पाणीही प्यायले, तरी ते म्हणतात बघा मोदींना पाणी पाजलं. मी उन्हात चेहऱ्यावरचा घाम पुसला, तर म्हणतात बघा मोदींना घाम फोडला. यांचा जगण्याचा आधार बघा. डुबने वाले को तिनके का सहाराही बहोत, दिल बहल जाए, फकत इतना इशाराही बहोत, इतने परभी आसमाँ वाला गिरा दे बिजलियाँ, कोई बतला दे जरा, ये डुबता फिर क्या करें - मोदी

https://twitter.com/ANI/status/1689625672682237952

18:25 (IST) 10 Aug 2023
PM Narendra Modi Speech Live: पंतप्रधान मोदी अविश्वास प्रस्ताव भाषण लाइव्ह

लंका हनुमानानं नाही, त्यांच्या गर्वानं जाळली. हे सत्य आहे. जनता भगवान रामाच्या रुपात आहे. त्यामुळेच ४०० वरून ४० झाले - मोदी

https://twitter.com/ANI/status/1689624587397672960

18:17 (IST) 10 Aug 2023
PM Narendra Modi Speech Live: पंतप्रधान मोदी अविश्वास प्रस्ताव भाषण लाइव्ह

ही इंडिया आघाडी नसून घमंडिया आघाडी आहे. आता प्रत्येकजण नवरदेव बनू इच्छितो. सगळ्यांनाच पंतप्रधान बनायचं आहे. त्यांनी हाही विचार केला नाही की कोणत्या राज्यात कुणाबरोबर तुम्ही कुठे पोहोचला आहात? पश्चिम बंगालमध्ये तुम्ही तृणमूलसोबत आणि कम्युनिस्ट पक्षाच्या विरोधात आहात. दिल्लीत एकत्र आहात - मोदी

https://twitter.com/ANI/status/1689626187130454016

18:15 (IST) 10 Aug 2023
PM Narendra Modi Speech Live: पंतप्रधान मोदी अविश्वास प्रस्ताव भाषण लाइव्ह

मतदारांना भुलवण्यासाठी गांधी नावही त्यांनी चोरून घेतलं. काँग्रेसची निवडणूक चिन्ह दोन बैल, गाय-बछडा आणि नंतर हाताचा पंजा हे सगळे त्यांच्या वृत्तीलाच दाखवतं. सगळं एका परिवाराच्या हातात केंद्रीत झाल्याचंच हे दर्शवत आहे - मोदी

18:14 (IST) 10 Aug 2023
PM Narendra Modi Speech Live: पंतप्रधान मोदी अविश्वास प्रस्ताव भाषण लाइव्ह

काँग्रेसशी जोडलेली कोणतीच गोष्ट त्यांची नाही. निवडणूक चिन्हापासून विचारांपर्यंत सर्वकाही काँग्रेस त्यांचं असल्याचा दावा करतेय. पण ते इतर कुणाकडून घेतलं गेलंय. आपल्या कमतरतांना झाकण्यासाठी निवडणूक चिन्ह व विचारही चोरले. पण तरी झालेल्या बदलांमध्ये पुन्हा पक्षाचा गर्वच दिसतो. २०१४पासून ते नकाराच्याच भूमिकेत आहेत. पक्षाचे संस्थापक ह्यूम विदेशी होते. १९२० मध्ये भारताच्या स्वातंत्र्ययुद्धाला नवा ध्वज मिळाला, नवी ऊर्जा मिळाली. पण रातोरात काँग्रेसनं तो ध्वजही हिसकून घेतला. १९२० पासून हा खेळ चाललाय - मोदी

18:12 (IST) 10 Aug 2023
PM Narendra Modi Speech Live: पंतप्रधान मोदी अविश्वास प्रस्ताव भाषण लाइव्ह

विरोधकांचं नामप्रेम आजचं नाही, अनेक दशकांपासूनचं आहे. त्यांना वाटतं नाव बदलून देशावर राज्य करता येईल. गरिबाला चहूबाजूला त्यांचं नाव दिसतं, पण त्यांचं काम कुठे दिसत नाही. रुग्णालयात नावं त्यांची आहेत, पण उपचार नाहीत. शिक्षण संस्था, रस्ते, उद्याने, योजना, क्रीडा पुरस्कार, विमानतळे, संग्रहालये यांना त्यांची नावं आहेत. पण त्या योजनांमध्ये हजारो कोटींचा भ्रष्टाचार केला. समाजाच्या शेवटच्या स्तरावर उभा व्यक्ती काम होताना पाहू इच्छितो. पण त्याला फक्त या कुटुंबाचं नाव मिळालं - मोदी

18:08 (IST) 10 Aug 2023
PM Narendra Modi Speech Live: पंतप्रधान मोदी अविश्वास प्रस्ताव भाषण लाइव्ह

यांची समस्या ही आहे की स्वत:ला जिवंत ठेवण्यासाठी यांना एनडीएचाच आधार घ्यावा लागला आहे. पण सवयीनुसार गर्वाचा आय यांना सोडत नाही. त्यामुळे एनडीएमध्ये गर्वाचे दोन आय टाकले. पहिला आय २६ पक्षांचा गर्व, दुसरा आय एका कुटुंबाचा गर्व. एनडीएही चोरला आणि इंडियाचेही तुकडे केले - मोदी

https://twitter.com/ANI/status/1689620296129708032

18:07 (IST) 10 Aug 2023
PM Narendra Modi Speech Live: पंतप्रधान मोदी अविश्वास प्रस्ताव भाषण लाइव्ह

दोन महिन्यांपूर्वीच तुम्ही यूपीएचे अंत्यविधी केले आहेत. शिष्टाचारानुसार मी तेव्हाच तुम्हाला सहानुभूती व्यक्त करायला हवी होती. पण उशीर झाला यात माझी चूक नाहीये. कारण तुम्ही स्वत:च एकीकडे यूपीएचे अंंत्यविधी करत होतात आणि दुसरीकडे जल्लोषही करत होते. जल्लोष कशाचा? उजाड भिंतींवर नवीन प्लास्टर लावण्याचा. तुम्ही जल्लोष करत होता खराब यंत्रावर नवीन पेंट लावण्याचा. मला आश्चर्य वाटत होतं की ही आघाडी घेऊन तुम्ही जनतेमध्ये जाणार आहात? मी विरोघकांना सांगेन की तुम्ही ज्यांच्या मागे चालत आहात, त्याला तर या देशाची भाषा, देशाच्या संस्कारांची समजच नाहीये. अनेक पिढ्यांपासून हे लोक लाल मिर्ची आणि हिरव्या मिर्चीमधला फरक समजू शकत नाहीयेत. वेश बदलून दगा करणाऱ्यांचं सत्य समोर येतंच. ज्यांना फक्त नावाचाच आधार आहे, त्यांच्यासाठी म्हटलं गेलं आहे.. दूर युद्ध से भागते, नाम रखा रणधीर, भाग्यचंद की आजतक सोयी है तकदीर - मोदी

https://twitter.com/ANI/status/1689620597540896768

17:58 (IST) 10 Aug 2023
PM Narendra Modi Speech Live: पंतप्रधान मोदी अविश्वास प्रस्ताव भाषण लाइव्ह

वी वाँट मणिपूर... मणिपूर, मणिपूर... मोदींच्या भाषणावर विरोधकांची लोकसभेत घोषणाबाजी

17:57 (IST) 10 Aug 2023
PM Narendra Modi Speech Live: पंतप्रधान मोदी अविश्वास प्रस्ताव भाषण लाइव्ह

मोदी काय निवडणुकीचा प्रचार करत आहेत का? - मोदींच्या टीकेवर विरोधकांनी आरडा-ओरडा करत व्यक्त केली नाराजी

17:55 (IST) 10 Aug 2023
PM Narendra Modi Speech Live: पंतप्रधान मोदी अविश्वास प्रस्ताव भाषण लाइव्ह

काँग्रेस पक्षाला कधीच भारताच्या सामर्थ्यावर विश्वास नव्हता. पाकिस्तान सीमेवर हल्ले करत होता. दहशतवादी हल्ले होत होते. नंतर जबाबदारी झटकत होता. यांचं पाकिस्तानशी प्रेम होतं की ते लगेच पाकिस्तानवर विश्वास बसायचा. हे तर म्हणायचे की पाकिस्तान सांगत आहे तर खरंच सांगत असेल - मोदी

17:51 (IST) 10 Aug 2023
PM Narendra Modi Speech Live: पंतप्रधान मोदी अविश्वास प्रस्ताव भाषण लाइव्ह

२०२८मध्ये जेव्हा विरोधी पक्ष अविश्वास प्रस्ताव आणेल, तेव्हा हा देश पहिल्या तीन देशांमध्ये असेल हा विश्वास आहे - मोदी

https://twitter.com/ANI/status/1689617486210367491

17:50 (IST) 10 Aug 2023
PM Narendra Modi Speech Live: पंतप्रधान मोदी अविश्वास प्रस्ताव भाषण लाइव्ह

यामुळेच काँग्रेसच्या सत्ताकाळात भारतात गरिबी वाढतच गेली. १९९१ मध्ये देश कंगाल व्हायच्या स्थितीत होता. काँग्रेसच्या शासनकाळात अर्थव्यवस्था जगात १०-११-१२ व्या क्रमांकावर होती. २०१४नंतर भारतानं पहिल्या पाच अर्थव्यवस्थांमध्ये आपलं स्थान निर्माण केलं आहे. काँग्रेसच्या लोकांना हे वाटत असेल की हे जादूच्या कांडीनं झालंय. पण निश्चित नियोजन आणि कठोर मेहनतीच्या जोरावर देश इथवर पोहोचला आहे - मोदी

https://twitter.com/ANI/status/1689616497117921280

17:48 (IST) 10 Aug 2023
PM Narendra Modi Speech Live: पंतप्रधान मोदी अविश्वास प्रस्ताव भाषण लाइव्ह

आम्ही म्हटलं होतं की आमच्या सरकारच्या तिसऱ्या टर्ममध्ये भारत जगातली तिसरी अर्थव्यवस्था बनेल. जेव्हा आम्ही हा दावा करतो, तेव्हा एक जबाबदार विरोधी पक्ष काय करेल, ते प्रश्न करतात की तुम्ही हे कसं करणार आहात? पण आता हेही मलाच शिकवावं लागतंय. त्यांनी काही सल्ला दिला असता. पण विरोधी पक्षांची समस्या ही आहे, काँग्रेसचे लोक काय म्हणतात.. किती हे कल्पना दारिद्र्य आहे. हे म्हणतात, या टार्गेटपर्यंत पोहोचण्यासाठी काही करायची गरजच नाही. असेच तिसऱ्या क्रमांकापर्यंत पोहोचून जाऊ. कदाचित त्यामुळेच ते इतकी वर्षं शांत बसले होते. याचा अर्थ काँग्रेसकडे ना नीती आहे, ना व्हिजन आहे - मोदी

https://twitter.com/ANI/status/1689615038049587200

17:45 (IST) 10 Aug 2023
PM Narendra Modi Speech Live: पंतप्रधान मोदी अविश्वास प्रस्ताव भाषण लाइव्ह

हे लोक देशाच्या ज्या संस्थां रसातळाला जाण्याचे दावे करतात, त्या संस्थांचं भाग्य उजळून निघतं. हे लोक ज्या पद्धतीने देशाबद्दल बोलत आहेत, मला विश्वास आहे की देशाचंही भलंच होणार आहे. आमचं तर होणारच आहे - मोदी

https://twitter.com/ANI/status/1689614257011527680

17:44 (IST) 10 Aug 2023
PM Narendra Modi Speech Live: पंतप्रधान मोदी अविश्वास प्रस्ताव भाषण लाइव्ह

त्यासाठी मी तीन उदाहरणं देईन. एकतर त्यांनी म्हटलं होतं बँकिंग क्षेत्र उद्ध्वस्त होऊन जाईल. मोठमोठ्या तज्ज्ञांना विदेशातून आणून त्यांच्याकडून हे बोलून घेत होते. पण आपल्या सार्वजनिक बँकांचा निव्वळ नफा दुप्पट झाला. त्यांनी फोन बँकिंग घोटाळ्याचा उल्लेख केला. पण एनपीए पूर्ण कमी करून नव्या दिशेनं वाटचाल सुरू केलं आहे.

दुसरं उदाहरण ... एचएएलवर बऱ्याच वाईट गोष्टी हे बोलले. एचएएल उद्ध्वस्त झालंय असं सांगितलं गेलं. आजकाल शेतांमध्ये जाऊन व्हिडीओ शूट केले जातात. तसेच त्या वेळी एचएएल कंपनीच्या दरवाज्यावर कामगारांची सभा घेऊन व्हिडीओ शूट केला होता. कामगारांना भडकवण्यात आलं होतं. पण आज HAL यशस्वी आहे.

तिसरं उदाहरण - एलआयसीबाबतही असेच दावे केले गेले. पण आज एलआयसी सातत्याने मजबूत होत आहे. शेअर मार्केटमध्ये रस असणाऱ्यांना हा गुरुमंत्र आहे. ज्या सरकारी कंपनीवर विरोधक आरोप करतील, त्यात तुम्ही गुंतवणूक करून टाका

https://twitter.com/ANI/status/1689613301167325184

17:39 (IST) 10 Aug 2023
PM Narendra Modi Speech Live: पंतप्रधान मोदी अविश्वास प्रस्ताव भाषण लाइव्ह

आज मी सभागृहात काही गुपितं सांगू इच्छितो. माझा विश्वास बसलाय की विरोधी पक्षाच्या लोकांना एक गुप्त वरदान मिळालं आहे. हे लोक ज्याचं वाईट चिंततील, त्याचं चांगलंच होईल. एक उदाहरण तर तुमच्यासमोर उभं आहे. २० वर्षं झाली. काय काय केलं नाही. पण माझं भलंच होत गेलं. त्यामुळे विरोधकांना हे गुप्त वरदान आहे - मोदी

https://twitter.com/ANI/status/1689610752326500353

17:37 (IST) 10 Aug 2023
PM Narendra Modi Speech Live: पंतप्रधान मोदी अविश्वास प्रस्ताव भाषण लाइव्ह

गेल्या तीन दिवसांत विरोधी पक्षांनी डिक्शनरी शोधून शोधून जेवढे अपशब्द सापडतील, ते बोलले. त्यांच्यासाठी सर्वात आवडती घोषणा आहे मोदी तेरी कब्र खुदेगी. पण माझ्यासाठी यांच्या अपशब्दांचंही मी टॉनिक बनवून घेतो - मोदी

17:36 (IST) 10 Aug 2023
PM Narendra Modi Speech Live: पंतप्रधान मोदी अविश्वास प्रस्ताव भाषण लाइव्ह

अविश्वास आणि गर्व विरोधकांच्या नसानसांत भिनला आहे. ते जनतेच्या विश्वासाला कधी बघूच शकत नाहीत. जुन्या विचारांचे लोक म्हणतात की जेव्हा काही शुभ होत असतं, घरात काही चांगलं होतं, मुलं चांगले कपडे घालतात तेव्हा काळं तीट लावतात. आज देशाचं चहूबाजूंनी चांगलं होत आहे, कौतुक होतंय तर मी विरोधकांचे आभार मानतो की काळे कपडे घालून काळ्या तीटाच्या रुपाने सभागृहात येऊन तुम्ही या चांगल्या गोष्टींना अजून चांगलं केलंय. त्यासाठी त्यांचे धन्यवाद करतो - मोदी

https://twitter.com/ANI/status/1689609484401078272

17:30 (IST) 10 Aug 2023
PM Narendra Modi Speech Live: पंतप्रधान मोदी अविश्वास प्रस्ताव भाषण लाइव्ह

विरोधकांनी अविश्वास प्रस्तावाच्या नावाखाली जनतेच्या आत्मविश्वासाला तोडण्याचा अपयशी प्रयत्न केला आहे - मोदी

https://twitter.com/ANI/status/1689610205703884800

17:29 (IST) 10 Aug 2023
PM Narendra Modi Speech Live: पंतप्रधान मोदी अविश्वास प्रस्ताव भाषण लाइव्ह

आम्ही भारताच्या तरुणांना घोटाळे नसणारं सरकार दिलं आहे. भारताच्या तरुणांना खुल्या आकाशात भरारी घेण्याची संधी दिली आहे, प्रोत्साहन दिलं आहे. आम्ही जगभरात भारताची बिघडलेली प्रतिमा सुधारली आहे. अजूनही काही लोक प्रयत्न करत आहेत की जगात आपल्या प्रतिमेवर डाग लागावा. पण जगाचा विश्वास वाढत चालला आहे - मोदी

https://twitter.com/ANI/status/1689607602592956416

17:23 (IST) 10 Aug 2023
PM Narendra Modi Speech Live: पंतप्रधान मोदी अविश्वास प्रस्ताव भाषण लाइव्ह

यावेळी अधीर बाबूंची काय अवस्था झाली. त्यांच्या पक्षानं त्यांना बोलण्याची संधीच दिली नाही. काल अमित शाहांनी फार जबाबदारीने सांगितलं की चांगलं वाटत नाहीये. अध्यक्षांनी उदार होऊन वेळ संपली तरी वेळ वाढवून दिली. पण गुळाचं शेण कसं करायचं यात हे तरबेज आहेत. मला माहिती नाही की तुमचा नाईलाज काय आहे? अधीर रंजन चौधरींना का बाजूला केलंय. कोलकात्याहून कुठला फोन आला आहे का कुणास ठाऊक. काँग्रेस वारंवार त्यांचा अपमान करते. कधी निवडणुकीच्या नावावर त्याना अनिश्चित काळापर्यंत गटनेते पदावरून हटवतात. आमच्या संवेदना अधीररंजन चौधरींच्या बाजूने आहेत - मोदी

https://twitter.com/ANI/status/1689609973071011840

17:20 (IST) 10 Aug 2023
PM Narendra Modi Speech Live: पंतप्रधान मोदी अविश्वास प्रस्ताव भाषण लाइव्ह

ज्यांचे स्वत:चे हिशेब चुकलेत, तेही आमच्याकडून आमचा हिशेब मागत फिरतायत - मोदी

17:19 (IST) 10 Aug 2023
PM Narendra Modi Speech Live: पंतप्रधान मोदी अविश्वास प्रस्ताव भाषण लाइव्ह

विरोधी पक्षांना हेच सांगेन, तुम्ही तयारी करून का येत नाहीत? मी तुम्हाला तयारी करून यायला सांगितलं होतं २०१८ मध्ये. तुम्हाला तयारीसाठी ५ वर्षं तयारीसाठी दिली. काय हाल आहेत तुमचे - मोदी

17:18 (IST) 10 Aug 2023
PM Narendra Modi Speech Live: पंतप्रधान मोदी अविश्वास प्रस्ताव भाषण लाइव्ह

अविश्वास प्रस्तावावरही तुम्ही कसली चर्चा केली. तुमचे दरबारीही फार दु:खी आहेत. ही अवस्था आहे तुमची. फिल्डिंग विरोधकांनी लावली, पण चौकार-षटकार सत्ताधारी बाकांवरून लागले. विरोधी पक्ष अविश्वास ठरावावर नो बॉल करत पुढे चालत राहिला. इथून सेंच्युरी होत होती, तिथून नो बॉल होत होते - मोदी

https://twitter.com/ANI/status/1689606142408925184

17:17 (IST) 10 Aug 2023
PM Narendra Modi Speech Live: पंतप्रधान मोदी अविश्वास प्रस्ताव भाषण लाइव्ह

काही विरोधी पक्षांच्या सदस्यांनी हे दाखवून दिलंय की देशापेक्षा त्यांना पक्ष मोठा आहे. विरोधकांना देशापेक्षा स्वत:च्या राजकीय भवितव्याची चिंता आहे - मोदी

17:16 (IST) 10 Aug 2023
PM Narendra Modi Speech Live: पंतप्रधान मोदी अविश्वास प्रस्ताव भाषण लाइव्ह

अधिवेशनाच्या सुरुवातीपासूनच विरोधकांनी कामकाजाच सहभाग घेतला असता तर चांगलं झालं असतं. गेल्या काही दिवसांत या सभागृहानं अनेक महत्त्वाची विधेयकं पारित केली. त्यावर सविस्तर चर्चा आवश्यक होती. पण राजकारण विरोधकांसाठी प्राधान्याची बाब होती. त्या विधेयकांमध्ये विरोधकांना रस नव्हता. देशाच्या जनतेनं ज्यासाठी त्यांना इथे पाठवलंय, त्या जनतेचाही विश्वासघात करण्यात आला - मोदी

17:12 (IST) 10 Aug 2023
PM Narendra Modi Speech Live: पंतप्रधान मोदी अविश्वास प्रस्ताव भाषण लाइव्ह

विरोधी पक्षांचा अविश्वास प्रस्ताव आमच्यासाठी शुभ ठरतो. आज मी बघतोय की तुम्ही ठरवलंच आहे की एनडीए व भाजपा २०२४ च्या निवडणुकीत जुने सर्व विक्रम तोडून मोठा विजय मिळवतील - मोदी

https://twitter.com/ANI/status/1689605133947281408

17:11 (IST) 10 Aug 2023
PM Narendra Modi Speech Live: पंतप्रधान मोदी अविश्वास प्रस्ताव भाषण लाइव्ह

२०१८मध्येही हा इश्वराचाच आदेश होता की विरोधी पक्ष अविश्वास प्रस्ताव घेऊन आले होते. तेव्हाही मी म्हटलं होतं की अविश्वास प्रस्ताव आमच्या सरकारची बहुमत चाचणी नाही, तर विरोधी पक्षांचीच बहुमत चाचणी आहे. झालंही तेच. जेव्हा मतदान झालं, विरोधी पक्षांकडे जेवढी मतं होती, तेवढीही ते जमा करू शकले नव्हते - मोदी

https://twitter.com/ANI/status/1689603670521098242

17:10 (IST) 10 Aug 2023
PM Narendra Modi Speech Live: पंतप्रधान मोदी अविश्वास प्रस्ताव भाषण लाइव्ह

देशाच्या जनतेनं आमच्या सरकारबाबत वारंवार विश्वास दर्शवला आहे. मी आज देशाच्या कोट्यवधी नागरिकांचे आभार व्यक्त करतो. असं म्हणतात, इश्वर फार दयाळू आहे. देवाची मर्जी असते की तो कुणा ना कुणाच्या माध्यमातून आपल्या इच्छांची पूर्ती करतो. मी हा देवाचा आशीर्वाद मानतो की देवानं विरोधी पक्षांना सुचवलं आणि ते अविश्वास प्रस्ताव घेऊन आले - मोदी

https://twitter.com/ANI/status/1689604140119498752

17:09 (IST) 10 Aug 2023
PM Narendra Modi Speech Live: पंतप्रधान मोदी अविश्वास प्रस्ताव भाषण लाइव्ह

गेल्या तीन दिवसांपासून अनेक सदस्यांनी आपले विचार मांडले. सगळ्यांचीच भूमिका माझ्यापर्यंत पोहोचली आहे. मी स्वत: काही भाषणं ऐकलीही आहेत - मोदी

17:03 (IST) 10 Aug 2023
PM Narendra Modi Speech Live: पंतप्रधान मोदी अविश्वास प्रस्ताव भाषण लाइव्ह

थोड्याच वेळात पंतप्रधान मोदींच्या भाषणाला होणार सुरुवात...

Pm Narendra modi on no confidence motion

पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी (दि. १० ऑगस्ट) अविश्वास प्रस्तावाला उत्तर देणार आहेत. (Photo - PTI)

PM Modi No Confidence Motion Live: मणिपूर हिंसाचार प्रकरणावरून विरोधकांच्या टीकेला पंतप्रधानांचं उत्तर