Typo puts UP man in jail for 22 days it takes 17 years to his clears name : न्याय व्यवस्थेच्या माध्यमातून न्याय मिळवण्यासाठी बऱ्याचदा अनेक वर्ष संघर्ष करावा लागतो. अशी अनेक उदाहरणे इतिहासात सापडतील. असाच काहीसा प्रकार उत्तर प्रदेशमध्ये समोर आला आहे. राजवीर सिंह नावाच्या एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली. पण पोलिसांना अटक करायची होती तो त्यांचा भाऊ रामवीर हा होता. पण अधिकाऱ्याने लिहिण्यात चूक केली आणि दोघांची नावे बदलली. यामुळे झालं असं की, रामवीर यांना २२ दिवस तुरुंगात काढावे लागले. पोलिसांनी काही आठवड्यातच त्यांची चूक मान्य केली, पण हा खटला कोर्टात १७ वर्ष शुरू होता.

या खटल्यामुळे काहीही चूक नसलेले रामवीर हे त्यांचे आयुष्य, त्यांच्या मुलांचे शिक्षण आणि त्यांची मनाची शांती हे सर्वकाही हरवून बसले. आता कुठे ५५ वर्षीय राजवीर यांची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता झाली आहे.

मैनपुरीच्या एका न्यायालयाने शनिवारी राजवीर सिंह यादव हे निर्दोष असल्याचा निकाल दिला. तसेच ज्या पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे त्यांना जवळपास दोन दशके त्रास सहन करावा लागला त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

“मी वारंवार सांगत राहिलो की, तो मी नाही. पण त्यांनी ऐकले नाही. त्यांनी मला उचललं आणि आणि तुरुंगात पाठवलं,” असे तीन मुली आणि एका मुलाचे वडील असलेल्या राजवीर यांनी टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले. “मी १७ वर्ष खटला लढलो. या काळात, कोणाला माहितीही नव्हतं की खटला कोणी दाखल केला आहे. त्यांनी फक्त माझं नाव पाहिलं आणि मला त्यामध्ये खेचलं. मी काम करू शकत नव्हतो. मी माझ्या मुलांना शिक्षण देऊ शकत नाव्हतो. मी सर्वकाही गमावलं.”

ते पुढे म्हणाले की, “मी कसंतरी माझ्या मुलींची लग्ने लावून देण्यात यशस्वी झालो. माझ्या मुलाला शाळा सोडावी लागली. आम्ही उध्वस्त झालो. माझ्याबरोबर ज्या अधिकाऱ्यांने हे केले त्यांना जबाबदार धरले जावे, अशी माझी इच्छा आहे. किमान मी जे काही सहन केलं त्याची भरपाई तरी मला मिळाली पाहिजे.”

नेमकं प्रकरण काय आहे?

हा खटला ३१ ऑगस्ट, २००८ सालचा आहे, जेव्हा मैनपुरी पोलिसांनी आयपीसी कलम ३०७ (हत्येचा प्रयत्न) आणि एससी/एसटी अॅक्ट अंतर्गत चार व्यक्तींविरोधात एफआयआर दाखल केला. यामध्ये मनोज यादव, प्रवेश यादव, भोला यादव आणि रामवीर सिंह यादव या नागला भांत गावातील लोकांचा समावेश होता. निवडणुकीतील वादाचे हे प्रकरण होते. त्यानंतर या कलमांमध्ये गँगस्टर अॅक्ट देखील जोडण्यात आला.

जेव्हा गँग चार्च तयार करणअयात आला होता तेव्हा मैनपुरी कोतवालीचे एसएचओ ओमप्रकाश यांनी एक मोठी चूक केली. त्यांनी रामवीर याच्याऐवजी त्यांचे थोरले बंधू राजवीर सिंह यादव यांचे नाव लिहिले. यानंतर या प्रकरणाचा तपास उप-निरीक्षक शिवसागर दिक्षीत यांच्याकडे सोपवण्यात आला. हे तेव्हा धन्नाहर पोलीस ठाण्याचे एसएचओ होते, असे राजवीर यांच्या वकीलाने सांगितले.

त्याच वर्षी १ डिसेंबर रोजी राजवीर यांना अटक करण्यात आले. तुरुंगातूनच त्यांनी आग्रा येथील स्पेशल गँगस्टर अॅक्ट कोर्टात याचिका केली, ज्यामध्ये त्यांचे नाव चुकून टाकल्याचा दावा त्यांनी केला. कोर्टाने संबंधित अधिकाऱ्याला सूचना केली. २२ डिसेंबर रोजी इन्स्पेक्टर ओमप्रकाश यांनी न्यायाधीशांसमोर राजवीर यांचे नाव चुकून घेण्यात आल्याचे मान्य केले. कोर्टाने त्याच दिवशी सुटकेचे आदेश जारी केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

न्यायमूर्ती मोहम्मद इक्बाल हे गँगस्टर अॅक्टचा खटल्याची सुनावणी घेत होते, त्यांनी मैनपुरीच्या एसएसपींना चूक करणाऱ्या पोलिसांविरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्याबाबत पत्र देखील लिहिले. पण कोर्टात कबूल करून आणि न्यायाधीशांनी इशार देऊनही एसआय शिवसागर दिक्षीत यांनी राजवीर यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले आणि हे प्रकरण लांबतच गेले.