हैदराबाद शहरातील मैलापाण्यामध्ये विशिष्ट प्रकाराचा पोलिओचा विषाणू सापडला आहे. राज्य सरकारने या पाण्याची चाचणी करण्यासाठी घेतलेल्या नमुन्यांमध्ये हा विषाणू सापडल्याचे प्रयोगशाळेने स्पष्ट केले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर तातडीने सरकारने संबंधित भागामध्ये पोलिओनिर्मुलना विरोधात अभियान सुरू केले.
तेलंगणातील अंबरपेठमधून घेण्यात आलेल्या चाचण्यांमधून vaccine derived polio virus type-II या प्रकारातील पोलिओचा विषाणू सापडला. राज्य सरकारचे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव राजेश्वर तिवारी यांनी याबद्दल माहिती दिली. २०११ मध्ये भारत संपूर्णपणे पोलिओमुक्त घोषित करण्यात आल्यानंतर सातत्याने काही काळाने पोलिओचा विषाणू कुठे आढळतो का, याची चाचणी केली जाते. त्याच पद्धतीची चाचणी करण्यासाठी अंबरपेठमधून मैलापाण्याचे नमुने घेण्यात आले होते. त्यापैकी काही नमुन्यांमध्ये पोलिओचे विषाणू आढळले. राज्य सरकारने आता २० ते २६ जून या कालावधीमध्ये हैदराबाद आणि रंगारेड्डी जिल्ह्याच्या काही भागांमध्ये पोलिओ निर्मुलनाचे अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 15th Jun 2016 रोजी प्रकाशित
Polio virus Found: हैदराबादमध्ये मैलापाण्यात आढळला पोलिओचा विषाणू
संबंधित भागामध्ये पोलिओनिर्मुलना विरोधात अभियान सुरू
Written by वृत्तसंस्था
Updated:

First published on: 15-06-2016 at 10:37 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Polio virus found in hyderabad sewerage water