भारतामध्ये अशुद्ध पाणी, कुपोषणाने सर्वाधिक मृत्यू
निकृष्ट आहार, उच्च रक्तदाब, धूम्रपान.. ही आहेत जगभरातील मानवी मृत्यूची कारणे. जगभरातील मानवी मृत्यूंबाबत वॉशिंग्टन विद्यापीठ आणि मेलबर्न विद्यापीठाने संयुक्त संशोधन केले आहे. माणसाच्या मृत्यूची जी विविध कारणे आहेत, त्याची आकडेवारी त्यांनी नुकतीच प्रसिद्ध केली.
भारतामध्ये अशुद्ध पाणी आणि कुपोषण यांमुळे सर्वाधिक मृत्यू होत असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
१९९०च्या काळात कुपोषण, असुरक्षित प्रसूती, अशुद्ध पाणी, अस्वच्छता आदी कारणांमुळे सर्वाधिक मृत्यू येत होता. पण २०१०नंतर चित्र बदलले आहे. आधुनिक जीवनशैलीमुळे अशुद्ध पाणी आणि अस्वच्छता ही मृत्यूची कारणे कमी झालीत आणि त्यांची जागा उच्च रक्तदाब आणि निकृष्ट आहार यांनी घेतली.
२०१३मध्ये जगभरात सर्वाधिक मृत्यू केवळ उच्च रक्तदाबामुळे झाले आहेत. या वर्षांत जगभरातील एक कोटी ४० लाख व्यक्तींच्या मृत्यूमागे उच्च रक्तदाब हे कारण होते. उच्च रक्तदाबाचा परिणाम जगभरातील मृत्युदरावरही झाला आहे. १९९० ते २०१३ या वर्षांमध्ये उच्च रक्तदाबामुळे मृत्युदरात ४९.१ टक्के वाढ झाली आहे.

’ दक्षिण व आग्नेय आशियात वायुप्रदूषणाचा सर्वाधिक परिणाम  आरोग्यावर होत असून त्यामुळे मृत्यू होत आहेत.
’ भारतात अशुद्ध पाणी आणि कुपोषण ही मृत्यूची कारणे आहेत.
’ १९९० या वर्षांत एकूण दोन कोटी ५१ लाख लोकांचा मृत्यू  झाला, २०१३ या वर्षांत तीन कोटी आठ लाख लोकांचा मृत्यू  झाला. ही संख्या १९९०पेक्षा २० टक्क्याने अधिक आहे.
’ आधुनिक जीवनशैलीत उच्च रक्तदाब, धूम्रपान, लठ्ठपणा, मधुमेह  आदी कारणांमुळे मृत्यू येण्याचे प्रमाण वाढले आहे.
’ निकृष्ट आहारामुळे हृदयविकार, पक्षघात आणि मधुमेह या  विकारांचे प्रमाण वाढले आहे.
’ जगभरात ताजी फळे, अन्नधान्ये आणि भाज्या खाण्याचे प्रमाण  कमी झाले आहे, लाल मांस आणि साखरयुक्त पदार्थाचे सेवन वाढले आहे.
’ कोलेस्ट्रॉलची अतिरेक वाढ, मद्यपान, धूम्रपान आदी कारणांमुळे  मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. जगभरात ४४ लाख पुरुष आणि १४
लाख महिलांचा मृत्यू धूम्रपानामुळे होतो.