दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील दिग्दर्शक केआर सच्चिदानंदन यांचे कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळे गुरुवारी निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या ४८व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. त्यामुळे दाक्षिणात्य चित्रपसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. केआर सच्चिदानंदन हे मल्याळम इंडस्ट्रीमध्ये सैची या नावाने ओळखले जायचे. ‘अय्यपनम कोशियुम’ या चित्रपटाने त्यांना ओळख मिळवून दिली होती.

टाइम्स नाउने दिलेल्या वृत्तानुसार सच्चिदानंद यांची तब्बेत बिघडल्यामुळे १६ जून रोजी त्यांना केरळमधील त्रिसूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. पण गुरुवारी रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. या घटनेनंतर दाक्षिणात्या चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. अनेक कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून सच्चिदानंदन यांना श्रद्धांजली वाहत आहेत.

केआर सच्चिदानंदन यांनी २००७मध्ये करिअरला सुरुवात केल्याचे म्हटले जाते. त्यांनी स्क्रिप्ट रायटर म्हणून सुरुवात केली होती. अभिनेता पृथ्वी सुकुमारनसोबत त्यांनी ‘अय्यपनम कोशियुम’ चित्रपटाची निर्मिती केला. या चित्रपटाने त्यांना लोकप्रियता मिळवून दिली.  या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती.