ओक्लाहोमा चक्रीवादळापुढे हिरोशिमा बॉम्ब ठरला खुजा

सोसाटय़ाचे वारे, आद्र्रता आणि पाऊस एकत्रितपणे आल्याने ओक्लाहोमाला चक्रीवादळाचा जोरदार तडाखा बसला आणि त्यामुळे ओक्लाहोमा शहरात हिरोशिमा अणुबॉम्बपेक्षाही अधिक ऊर्जा निर्माण झाली. जवळपास तासभर घोंघावणाऱ्या या वादळामुळे किती ऊर्जा निर्माण झाली त्याची मोजणी हवामान विभागाने वेळमूल्यमापनाने केली.

सोसाटय़ाचे वारे, आद्र्रता आणि पाऊस एकत्रितपणे आल्याने ओक्लाहोमाला चक्रीवादळाचा जोरदार तडाखा बसला आणि त्यामुळे ओक्लाहोमा शहरात हिरोशिमा अणुबॉम्बपेक्षाही अधिक ऊर्जा निर्माण झाली.
जवळपास तासभर घोंघावणाऱ्या या वादळामुळे किती ऊर्जा निर्माण झाली त्याची मोजणी हवामान विभागाने वेळमूल्यमापनाने केली. त्यांच्या अंदाजानुसार हिरोशिमा बॉम्बपेक्षा आठ ते ६०० पटीहून अधिक ऊर्जा निर्माण झाल्याचे स्पष्ट झाले.
विघातक चक्रीवादळाला कोणते घटक कारणीभूत आहेत त्याची शास्त्रज्ञांना जाणीव असली तरी वारा, आद्र्रता आणि पाऊस एकत्रितपणे इतक्या विघातक वादळात कसे रूपांतरित झाले ते शोधण्याची शास्त्रज्ञ धडपड करीत आहेत. ग्लोबल वॉर्मिगचे चक्रीवादळावर कोणते परिणाम होतात, त्याची निश्चिती करण्याचे प्रयत्नही सुरू आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Power of oklahoma tornado dwarfs hiroshima bomb

ताज्या बातम्या