Prajwal Revanna Sex Scandal Case: जवळपास तीन हजार व्हिडीओ क्लिप्स व्हायरल झाल्यानंतर उघड झालेलं प्रज्वल रेवण्णा सेक्स स्कँडल प्रकर गेल्या महिन्याभरापासून देशभर चर्चेत आहे. ऐन लोकसभा निवडणुकांच्या धामधुमीत कर्नाटकमध्ये उघड झालेल्या या प्रकरणामुळे माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या संयुक्त जनता दलाची प्रतिमा वादात सापडली होती. नुकतंच देवेगौडा यांनी स्वत: त्यांचा नातू प्रज्वल रेवण्णावर कारवाई करण्याचं आवाहन तपास यंत्रणांना केलं होतं. तसेच, त्याला भारतात परत येण्याचंही आवाहन त्यांनी केलं. आता स्वत: प्रज्वल रेवण्णानं एका व्हिडीओ क्लिपच्या माध्यमातून त्याची या प्रकरणावर भूमिका मांडली आहे.

प्रकरण उघड होताच फरार झाला प्रज्वल रेवण्णा

जवळपास महिन्याभरापूर्वी कर्नाटकमधील मतदानानंतर हे सगळं प्रकरण उघड झालं. प्रज्वल रेवण्णाच्या ड्रायव्हरनंच या सगळ्या क्लिप असणारा पेनड्राईव्ह पोलिसांच्या हवाली केला. त्यानंतर पोलिसांनी प्रज्वल रेवण्णाचा शोध सुरू केला. मात्र, तोपर्यंत तो विदेशात फरार झाला होता. त्याच्याविरोधात लुकआऊट नोटिसाही काढण्यात आल्या आहेत. गेल्या महिन्याभरात त्याचा कोणताही ठावठिकाणा लागला नव्हता. तसेच, त्याच्याकडून या संपूर्ण प्रकरणावर कोणतंही भाष्य किंवा बाजू मांडण्यात आली नव्हती. अखेर त्यानं एका व्हिडीओच्या माध्यमातून त्याची भूमिका मांडली असून तो व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.

What Kangana Said?
कंगनाचा धक्कादायक दावा, “कोणतीही नवी हिरोईन आली की तिला दाऊदसमोर..”
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Updates in Marathi
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात काय आहे स्थिती? कुणाला मिळाला विजय; कोण आघाडीवर? जाणून घ्या…
Raghuram Rajan reuters
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाला तर…”, भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत माजी RBI गव्हर्नर रघुराम राजन यांचं मोठं वक्तव्य
yogendra yadav
“लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे…”, योगेंद्र यादव यांचं मोठं विधान!
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
Manoj Jarange Warning to Devendra Fadnavis
लोकसभेच्या निकालानंतर मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांना इशारा, “..तर विधानसभेला इंगा”
Pune Porsche Accident Latest Updates in Marathi
Pune Porsche Accident:अश्विनी आणि अनिश यांना पोर्शने धडक देण्याआधी काय घडलं? डिनर प्लॅन आणि..
Ian Bremmer prashant kishor
भाजपाला किती जागा मिळणार? प्रशांत किशोरांपाठोपाठ अमेरिकन राजकीय संशोधकाने केलं विश्लेषण

“मी ३१ मे ला भारतात येणार”

इंडियन एक्स्प्रेसनं पीटीआयच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार हा व्हिडीओ एशियानेट सुवर्णा न्यूज या कन्नड वृत्तवाहिनीवर प्रसारित करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये प्रज्वल रेवण्णानं आपण ३१ मे रोजी भारतात येणार असून एसआयटीसमोर चौकशीसाठी हजर राहणार असल्याचं सांगितलं आहे.

“मी स्वत: शुक्रवारी ३१ मे रोजी सकाळी १० वाजता एसआयटीसमोर हजर राहीन आणि तपासात सहकार्य करेन. माझ्यावर करण्यात आलेल्या आरोपांना आणि दाखल गुन्ह्यांना मी उत्तर देईन. माझा न्यायालयावर विश्वास आहे. मला विश्वास आहे की माझ्यावर करण्यात आलेल्या चुकीच्या आरोपांमधून मी न्यायालयाच्या मदतीने सहीसलामत बाहेर पडेन”, असं प्रज्वल रेवण्णा या व्हिडीओ संदेशात सांगत आहे.

माजी पंतप्रधान देवेगौडांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा यांना पत्राद्वारे इशारा; म्हणाले, “जिथे कुठे असशील परत ये, अन्यथा…”

“ईश्वराची, लोकांची आणि माझ्या कुटुंबाची…”

दरम्यान, एकीकडे हा व्हिडीओ संदेश व्हायरल झालेला असताना संयुक्त जनता दल पक्षाकडून किंवा प्रज्वल रेवण्णाच्या कुटुंबाकडून यासंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. “ईश्वराची, लोकांची आणि माझ्या कुटुंबाची माझ्यावर कृपा असावी. मी ३१ तारखेला नक्कीच एसआयटीसमोर चौकशीसाठी हजर राहीन. तिथे आल्यानंतर या सगळ्या प्रकरणाला पूर्णविराम देण्याचा मी प्रयत्न करेन. माझ्यावर विश्वास ठेवा”, असंही प्रज्वलनं या व्हिडीओत म्हटलं आहे.