ओमानमध्ये भारतीय परिचारिकेची (नर्स) चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. गुरुवारी तिचा मृतदेह अपार्टमेंटमध्ये आढळून आला. चिकू रॉबर्ट नावाची ही महिला मूळची केरळची रहिवासी होती. ओमानमधील सलाह शहरातील बद्र अल समा रुग्णालयात ती काम करत होती. ‘टाइम्स ऑफ ओमान’मधील वृत्तानुसार, चार महिन्यांपूर्वी लग्न झालेली चिकू गर्भवती होती. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी चिकूच्या हत्येची कठोर शब्दांत निंदा केली असून, या सर्व प्रकरणाचा अहवाल मागितला आहे. दरम्यान, बद्र अल समा रुग्णालयाने तिच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे. चिकूची हत्या ही चोरीच्या कारणामुळे झाल्याचे काही वृत्तात म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pregnant indian woman stabbed to death in oman
First published on: 22-04-2016 at 11:50 IST