बिहारचे माजी दिवंगत मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर (Karpoori Thakur) यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जाहीर केलेल्या निवेदनात ही घोषणा करण्यात आली आहे. दीर्घ काळापासून कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न दिला जावा अशी मागणी होत होती. जी आता पूर्ण झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या निर्णयाबाबत आनंद व्यक्त केला आहे. बिहारचे जननायक अशी त्यांची ओळख होती. कर्पूरी ठाकूर यांचा जन्म १९२४ मध्ये झाला होता. बिहार राज्याचे ते पहिले बिगर काँग्रेसी मुख्यमंत्री होते. कर्पूरी ठाकूर हे बिहारचे दोनदा मुख्यमंत्री आणि एकदा उपमुख्यमंत्री होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची पोस्ट काय?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर पोस्ट करुन लिहिलं आहे की मला या गोष्टीचा आनंद आहे की सामाजिक न्यायाचे प्रतीक असलेले महान जननायक कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्या जन्माचं हे शताब्दी वर्ष आहे आणि त्याच वर्षात ही बातमी आली आहे.

uddhav thackeray devendra fadnavis eknath shinde
“मविआ सरकार फडणवीसांना अटक करणार होतं”, मुख्यमंत्र्यांच्या आरोपांवर उद्धव ठाकरे म्हणाले, “संजय राऊतांनी…”
Karnataka CM Siddaramaiah calls PM Modi nalayak loksabha election 2024
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी नरेंद्र मोदींना म्हटले ‘नालायक’; ‘चंबू’वरुन राजकारण का तापलंय?
Vijay Vadettiwars challenge to Dharmaraobaba Atram
“भाजपसोबतच्या बैठकीचे पुरावे दिल्यास राजकारण सोडणार, अन्यथा तुम्ही सोडा,” विजय वडेट्टीवार यांचे धर्मरावबाबा आत्राम यांना आव्हान
BJP leader conspiracy behind Arvind Kejriwal arrest
केजरीवालांच्या अटकेमागे भाजप नेत्याचे कारस्थान! संजय सिंह यांचा आरोप

अखिलेश यादव यांची पोस्ट काय?

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न जाहीर झाल्याबद्दल पोस्ट लिहिली आहे. जननायक कर्पूरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. सामाजिक न्यायाच्या आंदोलनाचा हा विजय आहे असं अखिलेश यादव यांनी म्हटलं आहे.

१९५२ मध्ये पहिल्यांदा आमदार

बिहार विधानसभेत १९५२ मध्ये कर्पूरी ठाकूर हे पहिल्यांदा आमदार झाले होते. त्यानंतर ते कधीही आमदारकीची निवडणूक हरले नाहीत. १९६७ मध्ये देशातल्या नऊ राज्यांमध्ये बिगर काँग्रेसची सरकारं आली. त्यावेळी बिहारच्या महामाया सरकारमध्ये कर्पूरी ठाकूर हे शिक्षण मंत्री आणि उपमुख्यमंत्री होते. १९७७ मध्ये ते पहिल्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. कर्पूरी ठाकूर यांनी समाजातील भेदभाव आणि असमानता यांच्या विरोधात आयुष्यभरासाठी संघर्ष केला.